११०
आपले अस्तित्व स्वतंत्रपणे राखल्याशिवाय
दुःखांना तोंड फोडता येणार नाही
आदि-द्रविड (मद्रास भागातील बहिष्कृत) समाजाची बरीचशी वस्ती मुंबईमध्ये धारावी (सायन) भागात आहे. बहुतेक लोक त्या भागात कातडे कमावण्याचे जे कारखाने आहेत त्यात मजूर म्हणून काम करीत असतात. या समाजातील काही तरुणांनी ' आदि-द्रविड युवक संघ * या नावाची एक संस्था चालविली आहे. या संस्थेची सर्वसाधारण सभा रविवार तारीख १४ नोव्हेंबर १९३७ रोजी माटुंगा येथील बपू हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. सभेस श्री. कमलाकांत चित्रे, श्री. शांताराम उपशाम व डी. व्ही. प्रधान वगैरे निमंत्रित पाहुणे म्हणून हजर होते. सभेचे आरंभी आदि-द्रविड समाजाकडून डॉ. बाबासाहेबांस मानपत्र अर्पण करण्यात आले व नंतर संस्थेची मामुली कामे उरकण्यात आली.
डॉ. साहेबांनी मानपत्राच्या उत्तरादाखल भाषण केले. ते म्हणाले,
प्रिय भगिनींनो व बंघुंनो, |
आपण जो माझा मानपत्र देऊन गौरव केला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. तुम्ही सर्व मंडळी मद्रास प्रांतातून मुंबई येथे कामकाजाकरिता आला आहात. आपापल्या गावात तुम्ही जात येत असता. तेव्हा तुमचा आणि तुमच्या प्रांतातील इतर लोकांचा ज्या ज्या वेळेस संबंध येईल त्या त्या वेळेस तुम्ही त्यांना एक गोष्ट पटवून द्यायला हवी. सध्या जी नवीन राजघटना अंमलात आली आहे तीत अस्पृश्य वर्गास जे राजकीय हक्क प्राप्त झाले आहेत ते अभूतपूर्व असे आहेत. अद्यापपावेतो आपल्या वर्गाच्या बाबतीत अशी गोष्ट घडली नव्हती. हे जे हक्क प्राप्त झाले आहेत त्यांचा उपयोग जर अस्पृश्य वर्गाच्या हिताकरिता पूर्णपणे झाला नाही तर ते मिळून न मिळून सारखेच. इतर कोणत्याही प्रांतापेक्षा मद्रास प्रांतातील बहिष्कृत वर्गाला अधिक जागा मिळाल्या आहेत. तसेच इतर कोणत्याही प्रांतापेक्षा तुमच्या प्रांतातील अस्पृश्य वर्गाची दुःखे अधिक आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला मिळालेल्या राजकीय हक्कांचा उपयोग तुम्ही योग्यरीतीने केला आहे का, असा प्रश्न केल्यास मोठ्या कष्टाने असे म्हणावे लागते
जनता : २० नोव्हेंबर १९३७.