आपले अस्तित्व स्वतंत्रपणे ..... तोंड फोडता येणार नाही पुछ
की तुम्ही याबाबतीत आपल्या कर्तव्याला जागला नाहीत. ३० जागांपैकी काही अगदी थोड्या प्रतिनिधींशिवाय सर्वजण आज काँग्रेसमध्ये विरून गेले आहेत. त्याचा परिणाम असा झाला आहे की त्या प्रांतातील अस्पृश्य वर्गाच्या गाऱ्हाण्यांना त्यामुळे गौणत्व आलेले आहे. तुम्हाला अस्पृश्य म्हणून लेखणारे व तुमच्यावर जुलूम करणारे कोण तर हिंदू व त्याच हिंदू लोकांनी आज सर्व काँग्रेस व्यापलेली आहे. आता त्यांच्याशीच जर अस्पृश्य वर्ग एक झाला तर तुमची गाऱ्हाणी दूर कशी होणार ? काँग्रेसमध्ये सामील झालेल्या अस्पृश्य वर्गाच्या प्रतिनिधींना अधिकारारूढ झालेल्या काँग्रेस मंत्रीमंडळाला पक्षाच्या शिस्तीप्रमाणे कोणत्याही गाऱ्हाण्याबद्दल कायदेमंडळात प्रश्न विचारता येणे शक्य नाही. त्यांच्याविषयी आकांडतांडव करून मंत्रीमंडळास ती गाऱ्हाणी दूर करण्यास भाग पाडणे तर दूरच राहिले. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा की तुमच्यावर जुलूम करणारे हिंदू म्हणजे काँग्रेस यांचेवर जर तुमचा एवढा विश्वास आहे तर तुम्हाला तुमचे भिन्न अस्तित्व मानण्याचे कारण काय ? उद्या तुम्हाला असा कोणीही प्रश्न विचारील की तुम्हाला खास राजकीय हक्कांची आवश्यकता तरी कोठे राहिली ? तेव्हा अस्पृश्य वर्गाचे जर कोठे हित होत असेल तर काँग्रेसमध्ये विरून जाण्यामध्ये नाही तर आपले अस्तित्व आज स्वतंत्रपणे जाहीर करून त्यांच्या अनेकविध दुःखांना वेळोवेळी तोंड फोडणे या नीतीमध्येच आहे. त्याशिवाय अस्पृश्य वर्ग जाचातून मुक्त होणार नाही व त्याची उन्नती होणार नाही. नंतर परत एक वेळ आदि-द्रविड समाजाचे आभार मानून डॉक्टर साहेबांनी आपले भाषण संपविले. यानंतर मद्रासकडील अस्पृश्यांचे एक पुढारी श्री. दि. ब. श्रीनिवासन यांचे भाषण झाले.