१११
पुढाऱ्यांच्या निधनानंतरही समाजकार्य अव्याहत
चालून ते चिरकाल टिकले पाहिजे
जनता दिनांक १३ नोव्हेंबर १९३७ मध्ये जाहीर केल्यानुसार शनिवार दिनांक २० नोव्हेंबर १९३७ रोजी रात्रौ ८ वाजता वडाळा, मुंबई येथे श्री. भाऊराव गायकवाड यांना मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. या प्रसंगी श्री. शंकरराव वडवलकर यांचे श्री. भाऊराव गायकवाड यांनी केलेल्या कामगिरीचे ओझरते सिंहावलोकन करणारे भाषण झाले. त्यानंतर श्री. भाऊराव गायकवाड यांचे मानपत्राला उत्तरादाखल भाषण झाले.
यानंतर मानपत्र अर्पण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले,
आजच्या प्रसंगी या समारंभाला मला हजर राहता आले याबद्दल मी स्वत:ला धन्य समजतो आणि म्हणून हा समारंभ घडवून आणल्याबद्दल मी येथील चालक मंडळीचा फार आभारी आहे. आपण नेहमी चळवळीची ज्योत पाजळण्यासाठी ज्या कामचलाऊ सभा करतो तशा प्रकारची ही सभा नाही. एका सन्माननीय अशा व्यक्तीच्या अभिनंदनाची ही सभा असून तिचे महत्त्व तितकेच मोठे आहे. श्री. भाऊराव यांचा दर्जा किती मोठा आहे, हे नव्याने सांगावयास नको. आजच्या मानपत्रातील भाषा त्यांना अतिशयोक्तीची वाटते पण माझ्या मते उलट ती पाण्यासारखी पातळ आहे. त्यामानाने भाऊरावांची कामगिरी अधिक अमोल अशी आहे. मला यावेळी वाईट वाटते हे की, हा मानपत्र अर्पण समारंभ वडाळा येथील सर्व रहिवाशांतफे न होता काही लोकांतफॅच तो होत आहे आणि दुसरे हा समारंभ सर्व मुंबई इलाख्यात, निदान मुंबई शहरातर्फे | तरी व्हावयास पाहिजे होता. असो. तरी पण या गोडप्रसंगी अध्यक्षपद. स्वीकारण्याविषयीच्या विनंतीला मला नाही म्हणता येईना.
गेल्या १० वर्षाच्या आपल्या समाजाच्या प्रगतीचा जेव्हा मी शांतपणे : विचार करतो त्यावेळी माझ्या मनात वारंवार दोन विचार घोळत असतात. एक
जनता : २७ नोव्हेंबर १९३७.