२०-११-१९३७ पुढाऱ्यांच्या निधनानंतरही समाजकार्य अव्याहत चालून ते चिरकाल टिकले पाहिजे - Page 97

| पुढाऱ्यांच्या निधनानंतरही . . . . . टिकले पाहिजे ५९

गांधीजीसारख्या पुरुषाबरोबर झगडण्यात यश मिळून आम्हास राजकीय हक्क

मिळाले आणि आपणाला राजकारणात समानतेचा दर्जा मिळाला. ब्राह्मण,

क्षत्रिय यांच्या मांडीला मांडी लावून कायदेमंडळात बसण्याची, त्यांच्याबरोबर

विचारविनिमय करण्याची संधीही मिळाली. हे सारे मिळवून घेण्याला मी फक्त

निमित्तमात्र झालो आहे, असे मला वाटते. दुसरी गोष्ट, श्री. भाऊराव

| गायकवाडांसारख्यांचे सहाय्य मिळाले नसते तर एकटा काही करू शकलो ' नसतो. आज जनतेकडून माझ्या कामगिरीबद्दल जे मला धन्यवाद मिळत | आहेत त्यापैकी शेकडा ८० टक्के भाग श्री. गायकवाड यांचा आहे, हे येथे नमूद

करावयाला मला मुळीच दिक्कत वाटत नाही. अशा या सर्वतोपरी लायक

पुढान्याचा आज जो येथे मानपत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे तो माझ्या ` दृष्टीने योग्य व अपूर्व असा आहे.

आता याप्रसंगी आपल्या चळवळीसंबंधी दोन गोष्टी सांगण्यास काही हरकत

नाही. या हिंदुस्थान देशात राष्ट्रीय काँग्रेस ही मोठी प्रबळ संस्था मानण्यात

येते. असे असूनही मी स्वतंत्र मजूर पक्षाचा सवतासुभा का निर्माण

केला ? याचे कारण एकच की काँग्रेसमध्ये ज्या भांडवलदार वर्गाचा अधिक

भरणा आहे ते आपले हित करावयाचे सोडून गोरगरीब, काममार व शेतकरी वर्गाचे

खरे हित कधीही करणार नाहीत. तसेच दुसरा एक पक्ष कामगार वर्गात निर्माण

झालेला आहे. या लाल बावट्याच्या चळवळीने श्रमजिवी वर्गाचे आजच्या

परिस्थितीत हित होईल किंवा नाही याची मला शंका वाटते आणि [म्हणून ] [या ]

नवीन स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना आपणाला करावी लागली आहे. आपल्या

पक्षाच्या वतीने गेल्या मुंबई प्रांतिक असेंब्लीच्या निवडणुकीत नाशिक

जिल्हयात श्री. भाऊराव गायकवाड यांची आपल्या [पक्षातर्फे ] [उमेदवार ] [म्हणून ]

निवड केली होती आणि काँग्रेसबरोबर सामना दिला. या निवडणुकीचा जेव्हा

निकाल लागला तेव्हा काँग्रेस पक्षाचा उमेदवार पहिला [येऊन ] [त्याला ] [१६,९०० ] [मते ]

तर श्री. भाऊरावांना १६,६५० मते पडली. अवघ्या २५० मतांचे अंतर या उभय

उमेदवारात पडले खरे ! पण माझ्या मते [हा ] [हिशोब ] [चुकीचा ] [आहे. ] कारण

आमच्यातील एक इसम आयत्यावेळी विरूद्ध उठला. त्याचे नाव घेणेही

याप्रसंगी योग्य वाटत नाही. त्याला ४,००० मते पडली. ही मते विभागली

गेली नसती तर श्री. भाऊराव [गायकवाडांनी ] [काँग्रेसच्या ] [उमेदवाराला ३,७५० ]

मतांनी मारला असता. यावरून श्री. भाऊरावांची लायकी [किती ] [आहे, ] [याची ]

सहज खात्री पटेल. मला सांगावयास आनंद वाटतो की, कायदेमंडळात [निवडून ]

आलेली सर्व माणसे लायक आहेत आणि [ज्या ] [माणसांविषयी ] [कायदे ] [कौन्सिलमध्ये ]

लोकांना आदर वाटतो त्यापैकी [श्री. ] [भाऊराव ] [हे ] [एक ] [आहेत. ]