डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ६०
स्त्री पुरूषांनी सभासद आपण स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे हरेक
देऊन की मी या सर्व झाले पाहिजे. मी आपणास आव्हान सांगतो
राजकारणाच्या बाबतीत चांगला अभ्यास केला आहे आणि या अभ्यासानुसार स्वतंत्र मजूर पक्षाचा कार्यक्रम आखला आहे. ज्यांना या कार्यक्रमाविषयी शंका वाटत असेल त्यांनी माझ्याकडे यावे. त्यांची संशयनिवृत्ती मी करीन. परंतु असे न करता लोकांची दिशाभूल करणारा मनुष्य खास लुच्चाच असला पाहिजे, असो. काँग्रेस ही विश्वामित्राची माया आहे. मायेविषयी मुक्तेश्वराने जे वर्णन केले आहे त्यात मुंगूस-सापाची मैत्री होती, उंदीर-मांजरीचे दूध पीत आहे, सिंह व हत्ती बंधुप्रेमाने राहात होते वगैरे गोष्टी आहेत. या गोष्टी सत्यसृष्टीत किंवा व्यवहारात कितपत पटतील ? तीच काँग्रेसची गोष्ट आहे. समाजाची अशी घटना झाली पाहिजे की तिचे प्रमुख पुढारी निधून गेले, दिवंगत झाले तरी समाजकार्य अव्याहत चालून ते चिरकाल टिकले पाहिजे आणि अशाच प्रकारच्या कार्याची योजना झाली तरच तो पक्ष किंवा समाज जगात वैभवशाली ठरेल.
डॉ. बाबासाहेबांचे भाषण संपल्यानंतर त्यांना व श्री. भाऊरावांना अनेक
संस्थांतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आले. या गोड मानपत्रसमारंभ प्रसंगी
प्रि. दोंदे, अ. आर. डी कवळी, मँचेस्टर मिल चे मॅनेजर हेमीसाहेब, कास्टीलसाहेब,
द. वि. प्रधान, भा. र. कद्रेकर, देवराव नाईक, वडवलकर, कमलाकांत चित्रे,
उपशाम मास्तर, श्री. मडकेबुवा, निळे, गायकवाड, रामजी बोरीकर, श्री. कोतवाल,
आरोळकर वगैरे प्रमुख मंडळी हजर होती. शेवटी आभार प्रदर्शनानंतर हा
समारंभ निरनिराळ्या मनोरंजक कार्यक्रमानंतर संपविण्यात आला.