प्रोफेसरांनी अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाच्या कामी स्वत:ला वाहान घ्यावे - Page 103

प्रोफेसरांनी अध्ययन, अध्यापनः ` ` ` ` ` `` वाहून घ्यावे ६५

असे मला वाटते. मी सुद्धा कधी कधी झोप येत नसली म्हणजे शेक्सपियर किंवा काव्य वगैरे वाचतो. नाही, असे नाही. पण ते केवळ वेळ घालविण्यासाठी त्या विषयावर मला विचार करता येत नाही

आमच्या कॉलेजातून हल्लीच्या काळी अगदी साधारण प्रतीचे शिक्षण दिले जाते, अगदी बी. ए. च्या परीक्षेपर्यंत एखाद्या तात्या पंतोजीच्या पद्धतीने शिक्षण दिले जाते हे कबूल. पण त्यातही आपल्याला सुधारणा करता येणार नाही असे नाही. आता मुंबई शहरातच आर्टस्‌ व सायन्स हे विषय शिकविणारी सहा मोठाली कॉलेज आहेत. प्रत्येक कॉलेज हे हल्लीच्या पद्धतीनुसार युनिव्हर्सिटीशी निगडित असले तरी त्याचे अस्तित्त्व हे एखाद्या स्वतंत्र विद्यालयाप्रमाणे विभक्तच आहे ; नाही का ! त्यामुळे काय होते की, या साऱ्याही सहा कॉलेजातून, निरनिराळया प्रोफेसरांकडून तेच तेच विषय पुन: पुनः शिकविले जातात. यामुळे कामाची निरर्थक पुनरावृत्ती होते. पण समजा या पद्धतीऐवजी आपण असे केले की, एल्फिन्स्टन्‌ कॉलेजात फक्त इतिहास व अर्थशास्त्र हेच विषय शिकविले जाण्याची सोय केली आणि ज्या प्रोफेसरांना हे विषय शिकवावयाचे असतील त्यांना एल्फिन्स्टन्‌ कॉलेजमध्येच ते विषय शिकविण्यासाठी आपण धाडले तर एकाच विषयांचे सात आठ प्रोफेसर एकत्र येऊ शकतील आणि मग त्यांच्या कामाची आपणाला साहजिक विभागणी करावी लागेल. एक प्रोफेसर प्राचीन हिंदुस्थानावरच व्याख्याने देतील. दुसरे प्रोफेसर ' बुद्धांचा काळ व खिस्तयुगाचा आरंभ ' या विषयावर व्याख्याने देतील, तिसरे प्रोफेसर ' मुसलमानी युग ', यावर व्याख्याने देतील तर चवथे ' मराठ्यांचे युग ' व पाचवे प्रोफेसर ' इंग्रजांचे युग ' यावर व्याख्याने देतील. त्यामुळे विषयांची अतिशय उत्तम वाटणी होईल आणि एकेका प्रोफेसराला आपापल्या विषयाचे पूर्ण अध्ययन करण्यास खूपच अवसर मिळेल आणि त्यामुळे त्याला आपापल्या विषयावर संशोधनकार्य करण्याकरता तयारी करावयाला भरपूर सवड मिळेल. इतर सुधारणा या मुंबई विश्वविद्यालयात घडवून आणण्याची वाट पाहात बसण्याऐवजी आपण पहिल्याने ही अगदी साधी सुधारणा ताबडतोब घडवून आणू या ! दरेक कॉलेजने एक दोन विषयासाठीच आपल्याला वाहून घ्यावे. त्यामुळे त्या विषयाचा संपूर्ण ग्रंथसंग्रह त्या कॉलेजात होऊ शकेल व आवश्यक असलेले वस्तुसंग्रहालयही एकेच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल. सर्व कॉलेजातील प्रोफेसरांना त्यांच्या त्यांच्या विवक्षित ठरविलेल्या प्रमाणाने पगार न देता तो विश्वविद्यालयानेच सर्वांसाठी सारखाच. ठेवावा. म्हणजे हल्लीप्रमाणे सरकारी कॉलेजात पगाराचे एक प्रमाण व खाजगी कॉलेजात दुसरे असा फरक होणार [नाही. ] पगाराची तक्रार नाहिशी झाल्यावर व कामाची उत्तम. वाटणी झाल्यावर शिक्षण देण्याचे कार्य व संशोधनकार्य झपाट्याने चालू होईल.