६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
माझे तर असे मत आहे की, प्रोफेसरांनी अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या कामी स्वतःला इतके वाहून घ्यावे की आपल्या घराकडे बघायला त्यांना मुळी सवडच मिळता कामा नये. ते काम संपूर्णपणे त्यांच्या पत्नीवरच सोपविण्यात आले पाहिजे. प्रोफेसर लोकांनी भलती कामे अंगावर घेऊन आपल्या जबाबदाऱ्यांचे क्षेत्र उगाच वाढवीत जावे ही गोष्ट मला मान्य नाही. अध्यापन व अध्ययन यामध्ये संशोधनही आलेच. या तीन गोष्टींखेरीज प्रोफेसरांनी दुसरे कोणतेही काम करता कामा नये.