६८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
की परिस्थितीमुळे इंग्रजांना येथे राहाणे भाग पडल. इंग्रजांच्या घोषणेमुळे आपली घटनात्मक संरक्षणाची मागणी जरी मागे पडल्यासारखी दिसत असली
तरी ..
आपला प्रश्न धसाला लावून-झाडून सारे जरी नाही तरी बरेच राजकीय हक्क प्रस्थापित करण्यात आपणास यश आल्याशिवाय राहाणार नाही, ही खात्री बाळगा.
मूलभूत हक्क नियामक कमिटीत आपण बरेच यशस्वी झालो, हे सांगण्यात मला आनंद वाटतो. कमिटीला सादर केलेला मूलभूत हक्कांचा माझा मसुदा मंजूर करण्यात आला. फक्त राज्यकारभारात व नोकरीत वर्गवारी करण्याच्या प्रश्नावर थोड़ा वाद झाला. वर्गभेद टाळण्याखातर मी काही उपाय सुचविले, त्यातही मला यश येईल, असे वाटते, जर तसे झालेच तर कायदेमंडळात व कार्यकारी मंडळात आपणास भरपूर संरक्षण मिळेल. अल्पसंख्यांक पोटकमिटीच्या दोघा अस्पृश्यांनी सर्वसाधारण दलित जनतेला मान्य नसलेला मसुदा सादर केला आहे, हे सांगण्यास मला वाईट वाटते. एकाची संयुक्त मतदार संघाची मागणी आहे (शेम शेमच्या आरोळ्या). दुसऱ्याने तर त्याच्यावर ताण केली व संयुक्त मतदार संघात विभाजक मतदार पद्धतीची मागणी केली (पुन्हा शेम शेम). या बाबतीत पोटकमिटीत असलेल्या इतर अल्पसंख्य जमातीचे सहकार्य मला लाभेल, अशी आशा आहे. कमिटी या प्रश्नांचा निर्णय बहुमताने लावणार आहे की, त्याबाबतीत तडजोडीची बोलणी करणार आहे, याचा मला नक्की अंदाज नाही. परंतु त्यांनी बहुमताच्या जोरावर निकाल लावला तर मी माझा घटना समितीशी असलेला संबंध अजिबात तोडून टाकेन (टाळया). मग काय काय करावे ते आपण ठरवू. राजकीय प्रश्नात स्वकर्तव्याची दुहेरी जबाबदारी आपणास पार पाडावयाची आहे. एक स्वजनाविषयी व दुसरी देशाविषयी. हिंदुस्थान स्वतंत्र झाला पाहिजे, अशी आपली सर्वांची इच्छा आहे. त्रिमंत्री योजनेमध्ये जरी आमची उपेक्षा केली गेली तरी. या देशाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करायच्या नाहीत, ही जाणीव ठेवूनच मी वागत आहे. हिंदुस्थानला स्वातंत्र्य संपादन अधिक सुलभ तऱ्हेने करता आले पाहिजे, याच भावनेने व जाणिवेने मी आतापर्यंत बरीच भाषणे केली आहेत. पण त्याबरोबरच मी हेही निश्चयाने म्हणू शकतो की, राजकीय हक्कांची तरतूद करून ६ कोटी अस्पृश्य लोकांना जर संरक्षण देण्यात आले नाही व अस्पृश्यांना हव्या असलेल्या सवलतीसंबंधी तडजोड करण्याची कॉग्रेसने जर तयारी दाखविली नाही तर घटना समितीतून बाहेर पडण्याच्या माझ्या भूमिकेबद्दल मला कोणी दोष देणार नाही, याची मला खात्री आहे. २९६ सभासदांच्या