२७-५-१९४७ अस्पृश्य कामगारांनी कोणाच्याही थापेबाजीस बळी न पडता स्वत:चीच संघटना अधिक बळकट केली पाहिजे - Page 108

२०७

अस्पृश्य कामगारांनी
कोणाच्याही थापेबाजीस बळी न पडता
स्वतःचीच संघटना अधिक बळकट केली पाहिजे

मुंबईतील एच. एम. आय. डॉकयाडमधील अस्पृश्य कामगारांमाफत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १००१ रुपयांची थैली अर्पण करण्याचा समारंभ मे. एस. एस. मोकळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार ता. २७ मे १९४७ रोजी सायंकाळी ६ वाजता सिद्धार्थ कॉलेजमध्ये मोठ्या थाटाने साजरा झाला. सदर समारंभास भाई ए. व्ही चित्रे, मुंबई शहर शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी श्रीयुत भातनकर वगैरे प्रमुख मंडळी हजर होती.

प्रथम अध्यक्षांनी अस्पृश्य कामगार संघाने अस्पृश्य कामगारांसाठी आजपर्यंत काय काय केले ते सविस्तर सांगितले. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना थैली अर्पण केली.उत्तरादाखल भाषण करण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले, त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. सभेस अडीच ते तीन हजार जनसमुदाय होता.

डॉ. आंबेडकर म्हणाले,

आज माझा भाषण करण्याचा मुळी इरादाच नाही. कारण तुम्ही केलेल्या ह्या कार्याबद्दल मला फारसे समाधान वाटत नाही, परंतु रिवाजाप्रमाणे मला तुमचे आभार मानले पाहिजेत. गोदीमध्ये तीन ते चार हजार अस्पृश्य कामगार असून, फक्त एक हजार रुपयेच समाजकार्यासाठी जमावेत ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. गोदीमधील कामगारांना मी मजूरमंत्री असतानाच पाचसहा वेळा पगारवाढ मिळालेली आहे. दारु पिणे, सिनेमा व नाटकासाठी पैशाची उधळपट्टी करणे वगैरे व्यसनासाठी तुम्हास हवा तेवढा पैसा मिळतो. पण समाजकार्यास हातभार लावतेसमयी तुम्ही आढेवेढे मात्र घेता. असो !

१९३४ साली मुसलमानांना शेकडा २५ टक्के हे प्रमाण सरकारी नोकऱ्यांमध्ये ठरवून दिले. त्यावेळी अस्पृश्यांना राखीव जागा नव्हत्या पण मी प्रांतिक आणि हिंदुस्थान सरकारशी मोठा झगडा ऊठवून अस्पृश्य वर्गास शेकडा आठपूर्णाक

गरुड : १५ जून १९४७,