२७-५-१९४७ अस्पृश्य कामगारांनी कोणाच्याही थापेबाजीस बळी न पडता स्वत:चीच संघटना अधिक बळकट केली पाहिजे - Page 109

अस्पृश्य कामगारांनी ....... केली पाहिजे ७१

ऐकतृतीयांश सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधीत्व मिळवून दिले. पुढे १९४२ ते १९४५ अखेरपर्यंत मी मजूरमंत्री पदावर असताना अस्पृश्य वर्गास भरमसाठ नोकऱ्या मिळवून दिल्या, मी माझ्या जागेचा राजीनामा सादर करण्याच्या आदल्या दिवशीच मला समजले की हिंदुस्थान सरकारने अस्पृश्य वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात शेकडा बारापूर्णांक दोनतृतीयांश सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रमाण ठरवून दिले आहे. हे सर्व मी भांडून झगडूनच तुम्हास कायद्याने मिळवून दिले आहे. आता तुम्ही ते पदरात पाडून घ्यावयाचे आहे. त्यासाठी तुम्हास नेहमी संघटित राहिले पाहिजे. तुमची जर संघटना बळकट नसली तर सरकारने तुमच्यासाठी केलेल्या योजना कणवातच राहतील. म्हणून देशामधील परिस्थितीकडे लक्ष देऊन अस्पृश्य कामगारांनी अस्पृश्य कामगार हितवर्धक संघाची संघटना अधिक बळकट केली पाहिजे. काँग्रेस, कम्युनिस्ट वगैरे कोणाच्याही थापेबाजीस बळी न पडता गोदीमधील अस्पृश्य कामगार संघाच्या प्रमुख लोकांच्या मार्गदर्शनाखालीच तुमचा लढा यशस्वी करा !

डॉ. आंबेडकर साहेबांचे भाषण संपल्यानंतर श्रीयुत जी. के. भालेराव व श्री. एस. बी. शेडवईकर वगैरे पुढाऱ्यांची प्रसंगोचित भाषणे झाली व जयभीमच्या जयजयकारात सभा विसर्जन पावली.