अल्पसंख्यांकांची समजूत . . . .. . चालवता कामा नये ७७
आणि ही गोष्ट काही सोपी नाही, निवांत अभ्यासिकेत किंवा रसायन अथवा
पदार्थ विज्ञान शास्त्राच्या प्रयोग शाळेत बसून असले कठीण प्रश्न सुटत नसतात
व हे काम तितकेसे सोपे नाही. त्यासाठी याहूनही काही अधिक केले
पाहिजे. तुम्ही केवळ राज्यशास्त्र, इंतिहास, व्यापार, आयात-निर्यात. चलन
आणि जे जे विषय आपल्या लोकांच्या जीवनात महत्वाचे आहेत त्याचा अभ्यास
करणार आहात असे नसून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या जोरावर तुम्ही स्वतःलाच
नव्हे तर या देशाची राज्यधुरा जे राजकारणी पुरुषं वाहतात त्यांनाही देशातील
कठीण प्रश्न सोडविण्यात मदत करणार आहात आणि त्यांचे कुठे चुकते तेही
दाखवून देणार आहात आणि एवढ्याचसाठी मी असे म्हणतो की निदान ह्या
कॉलेजातील विद्यार्थी, आणि मी अशी आशा करतो की सबंध हिंदुस्थानमधील
nal आट जरी नाहीत तरी ह्या इलाख्यातील इतर कॉलेजातील जातील विद्यार्थीही आज एका नवीन
दालनात प्रवेश करीत आहेत
तुम्ही हे ' पार्लमेंट ' म्हणजे केवळ एक करमणूक आहे असे समजणार नाही
` असे मला वाटते. काही तरुणांच्या अति उत्साहाला योग्य स्थळ मिळणे अशक्य
होते म्हणूनच या ठिकाणी येऊन तो अति उत्साह टिंगल करण्यात किंवा थट्टा ` मस्करीत आणि हसण्यात घालविण्याचे हे स्थळ आहे असे तुम्ही समजू नये.
उलट, त्याच्या इतमामाला साजेशा गंभीरपणाने तुम्ही त्यात भाग घ्याल अशी मला
आशा आहे आणि ह्या सभागृहातील सरकारचे सभासद व विरुद्ध पक्षातील नेते,
. केवळ दोन बाजूकडील नेतेच नव्हे तर सर्वच सभासद या सभागृहात येऊन
उपस्थित प्रश्नांवर आपल्या मगदुराप्रमाणे अभ्यासपूर्ण चर्चा करतील अशीही मला
. आशा आहे.
यानंतर आणखी एक गोष्ट तुम्ही नीट ध्यानात धरली पाहिजे आणि ती म्हणजे
, ही की एकतंत्री राज्यकारभारात हुकूमशहाच्या किंवा राजाच्या इच्छेवर हुकूम |
` कायदे होतात आणि अशा ठिकाणी वक्तृत्व अनावश्यक ठरते. पूर्ण सत्ताधारी
: राजाला किंवा हुकूमशहाला वक्तृत्वाकडे लक्ष देण्याचे काही कारण नसते कारण
त्याची इच्छा हाच कायदा असतो. परंतु पार्लमेंटमध्ये कायदे केले जातात
YC ५7 -- क आणि जरी ते कायदे लोकांच्या इच्छेवरूनच केले जांतात तरी ज्याच्या विरूध्द
पक्षाला आपल्या बाजूला ओढून घेण्याची कला असते तोच आपल्या विरूध्द
बाजूच्या मतावर विजय मिळवू शकतो. ह्या सभागृहात तुमच्या विरूध्द
असणाऱ्यांना मारहाण करून तुम्ही बहुमत मिळवू शकत नाही. तसेच,
अल्पसंख्य बाजू गुंड लोक आणूंन बहुसंख्यकांना दबवून ठेवू शकत नाही आणि
बहुसंख्यही आपला जय व्हावा म्हणून अल्पसंख्यांकांना मारहाण करू शकत
नाहीत. ह्या सभागृहात जर कोणाला आपले म्हणणे मान्य करवून घ्यावयाचे असेल