७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
तर ते फक्त वक््तृत्वाच्या जोरावरच, त्याला आपल्या विरूध्द बाजूला वादविवाद करून, आवर्जून आपल्या बाजूला ओढून घ्यावे लागेल. मग तो वादविवाद काही वेळा सौम्य असेल किंवा काही वेळा तिखट असेल पण तो नेहमीच तकंशुध्द व विचारशील असला पाहिजे. म्हणूनच पार्लमेंटसारख्या संस्थेमध्ये यश मिळवावयाची गुरूकिल्ली म्हणजे सभागृह.आपल्या कह्यात आणण्याची पात्रता, यासाठीच तुम्ही महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी पूर्ण तयारीने सभागृहात यावयास पाहिजे आणि म्हणूनच तुम्ही सभेत भाषण करण्याची कला शिकण्यासाठी परिश्रम . केले पाहिजेत. मी माझ्या अनुभवावरून सांगतो की, शिकावयाला कला काही मोठी कठीण नाही. मी स्वतः काही कोणी फार मोठा वक्ता नाही. आणि समजा एखाद्याने, हिंदी राजकारणात ज्यांनी भाग घेतला त्यांचा इतिहास लिहावयाचे मनावर घेतले तर तो माझा उल्लेख एक मोठे वक्ते अशा कसल्याही आधारावर करू शकणार नाही आणि त्या मानाचा भुकेलेलाही मी नाही. एक वेळ अशी होती की मी माझा लाजाळूपणा कसा घालवू शकेन अशी मला चिता होती आणि त्यामुळे मी इतका निराश झालो होतो की सिडेनहॅम कॉलेज मधील प्रोफेसरची नोकरी विद्यार्थी माझी टिंगल करतील एवढ्याच कारणावरून मी सोडून देणार होतो, परंतु मी तुम्हाला आश्वासन देतो की ज्यांना माझ्यासारखी ही अशी भीती वाटत असेल त्यांनी ती भीती टाकून भाषेवर प्रभुत्व मिळवण्याच्या प्रयत्नाला लागावे ; त्यात अवघड असे काहीच नाही, असे माझे मत आहे. हे सभागृह जर व्यवस्थित चालावयाचे असेल तर एक मोठी महत्वाची अट मनात वागवली पाहिजे आणि ती अट म्हणजे अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला. पूर्ण मान देणे. अध्यक्षांच्या निर्णयावर तुम्ही कसलीही शंका काढता कामा नये. जर एखादा तसा कठीण प्रश्न उद्भवलाच व पूर्वी तशा प्रकारचा काही आधार नसल्यामुळे किंवा अध्यक्षांना त्यावर एकदम निर्णय देणे अशक्य झाले तर अध्यक्ष सभासदातील निरनिराळ्या पक्षांना त्यावर आपापली मते व्यक्त करावयास व त्याची छाननी करून अर्थ करावयास सांगतील. पण अशा प्रकारची एखाद्या ' निर्णयाची सर्व बाजूंनी छाननी झाल्यानंतर अध्यक्ष आपणाला योग्य असा जो निर्णय देतील तो तुम्ही वेदवाक्यासारखा मानला पाहिजे, मग तो निर्णय कितीही चुकीचा असो. १९२६ पासून १९४६ पर्यंतची काही थोड़ी वजा जाता सर्व वर्षे मी पार्लमेंटरी सभागृहातील कामकाजात घालविली आहेत. तेवढ्या अवधीत हर एक नमुन्यांचे अध्यक्ष मी पाहिले आहेत. त्यात चांगले होते, वाईट होते, निःपक्षपाती होते, पात्र होते, अपात्र होते, समतोल होते आणि इतरही गुणावगुण असलेले होते, परंतु आम्ही त्यांच्या निर्णयाचा मान नेहमीच राखीत असू. पार्लमेंटचे कामकाज कसे चालते यांचे ज्याला मी " प्रात्यक्षिक ज्ञान "