८२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
बोलावयास लावून ग्लॅडर्स्टन व लार्डनॉर्थब्रुक यांची कशी भंबेरी उडदली हा वृत्तांत निवेदन केला आणि याचमुळे * क्लोजर "' ची पद्धत कशी अस्तित्वात आली
हे सांगितले.
आता जरी सगळ्याच कायदेमंडळातून वादविवाद संपवून प्रश्नोत्तरासाठी वेळ राखण्याचा नियग असला तरी वादविवादालाही पुरेशी वेळ ही मिळतेच. एक गोष्ट लक्षात ठेवा की पार्लमेंटमध्ये जी चर्चा चालते तिचा उपयोग केवळ निर्णय घेता यावा एवढ्या पुरताच मर्यादित नसून त्या विषयाला त्याहूनही अधिक महत्व आहे. जर कॉमन्स वादविवाद उच्च पातळीवर झाला असेल आणि जर असा झालेला वादविवाद व्यवस्थितपणे वर्तमानपत्रातून प्रसिध्द केला जाईल तर जनतेला त्यायोगे राजकीय शिक्षण मिळण्याचे एक अमोघ साधन निर्माण होईल यात काही संशय नाही आणि हाच त्याचा महत्वाचा विशेष आहे.
पार्लमेंटरी राज्यपद्धतीला स्वसत्ताक राज्यपद्धत असे मानले जाते व ते खरेही आहे. परंतु अधिक महत्त्वाची सांगावयाची गोष्ट ही की देशाला विशेष गरज असते ते सुराज्य तुम्हास कसं निर्माण करता येईल याची ? हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यावर आग्रहपूर्ण एकांगीपणाने काही प्रतिपादावयाचे नाही. परंतु मी तुम्हापुढे एक दोन मते विचारार्थ म्हणून मांडणार आहे. माझ्या मते सुराज्य म्हणजे काय ? आग्रहपूर्ण एकांगीपणाचे अमुकच एक मत मांडता कामा नये. भांडवलबाल्याना भांडवलशाही राज्यपद्धती व खुल्या व्यापाऱ्याचे तत्त्व यात सुराज्य आढळेल. समाज सत्तावाद्यांना समाजवादी पद्धत सुराज्याची वाटेल आणि इतर अनेक मतांच्या अनेक माणसांना त्याच्या मनाची राज्यपद्धती सुराज्याची निदर्शक वाटेल. तेव्हा वस्तुस्थिती अशी आहे की सुराज्य म्हणजे काय यावर नाना तऱ्हेची मते असू शकतील. विविध वर्ण, वंशाचा आमचा समाज
व त्यामुळे निर्माण होणारे अनेक बिकट गुंतागुंतीचे प्रश्न यांची उकल करायला
एकमेव असा उपाय मिळणे कठीणच. यासाठी निरनिराळे उपाय योजिले पाहिजेत आणि ही गोष्ट तुम्ही नीट ध्यानात घेतली पाहिजे असे मला वाटते. आपल्या देशाची दुःस्थितीतून मुक्तता करण्यासाठी प्रखर अशा एकाच उपायाचा आपण स्वीकार करता कामा नये, असे उपाय अनेकविध असतील आणि त्यांचा उपयोग करण्यासाठी समाजाने तशी दक्षता घेतली पाहिजे. समाजाचा पाया भक्कम असावा आणि त्याचे ध्येय विशाल असावे. समाजाची नजर संकुचित नसावी व त्याने कुठल्याही एका तत्त्वाला श्रेष्ठ मानू नये. सामाजिक उन्नतीसाठी अनेक उपाय असतील आणि निरनिराळे लोक निरनिराळ्या उपायावर विश्वास ठेवीत असतील तर देशामध्ये त्या त्या प्रमाणे एकाहून अधिक पक्ष नांदणारच. माझ्या मते राजकारणात प्रामाणिकपणा असावा. मला माहीत