१०-१०-१९४७ अल्पसंख्याकांची समजून घातलीच पाहिजे; त्यांच्यावर जुलमी अधिकार चालवता कामा नये - Page 121

अल्पसंख्यांकांची समजूत . . . . . . चालवता कामा नये ८३

आहे की अनेकांच्या मते राजकारणी पुरुष अप्रामाणिक असतात. याचा अर्थ काय ? याचा अर्थ असा की ज्यांना अमुक एक तत्त्वज्ञान हाच समाज उद्धाराचा उपाय असे वाटते त्यानी, ज्यांना तसे वाटत नाही त्यांच्यापासून आपण निराळे राहावे. तडजोड करून निर्माण झालेले रांज्ययंत्र हे कुचकामाचे असते आणि ही गोष्ट मी तुम्हास असंदिग्धरित्या सांगतो. कारण, राज्य म्हणजे निर्णय आणि जोपर्यंत समाजसत्तावादी ज्याला एकामनाचे व निश्‍चयाचे म्हणतात असे लोक की, ज्यांचे जीवन तत्त्वज्ञान एकच आहे, ह्या राज्य शकटावर येत नाहीत तोपर्यंत अशा राज्यंव्यवस्थेत तुम्हाला, तुमच्या मताला योग्य असा निर्णय घेता येणार नाही व तुम्हाला कामाचा झटपट उरकही करता येणार नाही. भांडवलदार व समाजसत्तावादी यांच्या संमिश्र मंत्रिमंडळाला एखाद्या विषयावर निर्णय घ्यावयाचा असेल तर त्यांना आपल्यातील मतभेद आधी मिटवून घ्यावे लागतील आणि दुसऱ्या पक्षाची अनुमती घेण्यासाठी ह्यांना आपल्या तत्त्वाचा बळी द्यावा लागेल आणि अशारीतीने घेतलेला निर्णय, धड घोडा नव्हे धड गाढवही नव्हे अशाच नमुन्याचा असणार हे उघड आहे. म्हणून या कॉलेजमध्ये पार्लमेंटरी लोकशाहीची सुरवात करण्यापूर्वी आपणाला एकमेकाविषयीचे निश्‍चित ज्ञान, योग्य कल्पना व विचार आले असले पाहिजे.

आता ह्या लढाईत कोण विजयी होणार हे पाहाण्यासाठी समरांगणावर हजर राहाण्याची आम्ही कोशीस करू. काँग्रेस व समाजवादी या दोघाही विषयी आम्हास सारखीच आत्मीयता वाटते; कारण यात आपल्या देशाच्या अडचणीच्या प्रसंगात तुम्ही मदत करण्यास योग्य व्हावे एवढाच आमचा उद्देश आहे.

eo ७ ७