१४-१-१९४८ राजकारणाच्या दोऱ्या विद्योशिवाय हाती येणार नाहीत - Page 122

२५२

राजकारणाच्या दोऱ्या
विद्येशिवाय हाती येणार नाहीत

बुधवार ता. १४ जानेवारी १९४८ रोजी मुंबईतील 'धोबी तलाव नाईट स्कूल' मधील विद्यार्थ्यांचा वक्तृत्व चढाओढीचा समारंभ सिद्धार्थ कॉलेजमध्ये सायंकाळी ८ वाजता साजरा झाला. या समारंभाची दोन वैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसून येत होती. पहिले वैशिष्ट्य हे की, 'अ' 'बी' सी' या अक्षरांना कसे फाटे फोडावेत हे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या या छोट्या समारंभास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोठ्या आत्मियतेने हजर राहिले होते. दुसरे वैशिष्ट्य विद्यार्थ्यांच्या मनोनिग्रहाचे होते. ज्या तरुणांना, दारिठ्र्यामुळे बालवयातच शाळेच्या पायऱ्या हिरमुसल्या चेहऱ्यानी उतराव्या लागल्या व पोटाची गुजराण करण्यासाठी गिरणी कारखान्याच्या स्वाधीन व्हावे लागले, अशा ३५० तरुणांनी फिरुन जोम धरुन नोकरी करीत करीत या नाईट स्कूलमध्ये अध्ययन चालविलेले आहे, अशा विद्यार्थ्यांचा हा समारंभ होता. अध्यक्षस्थानी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे वाईस चेअरमन श्री. डी. जी. जाधव यांची योजना केली होती. श्री. हुदलीकर, श्री. केळशीकर व श्री. भास्करराव भोसले ह्या तिघांची निवाडा-कमिटी नेमली होती. वक्तृत्त्वाच्या चढाओढीसाठी तीन विषय ठेवण्यात आले होते. (१) अस्पृश्य तरुणांचे कर्तव्य (२) मला हिंदू धर्माबद्दल काय वाटते ? (३) सिनेमा पहाणे चांगले की वाईट ? नऊ विद्यार्थ्यांनी या चढाओढीत भाग घेतला होता. (१) कु. हाटे, (२) कुमार कांबळे, (३) कु. जाधव या अनुक्रमाने चढाओढीचा निकाल लागला.

नाईट स्कूलचे संचालक, वादविवाद मंडळाचे सेक्रेटरी व समारंभाचे अध्यक्ष यांनी समयोचित भाषणे केल्यानंतर, टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. बाबासाहेबांनी आपले भाषण सुरू केले. ते म्हणाले,

प्रिय मित्रहो, |

आज जो वक्तृत्त्व चढाओढीचा समारंभ झाला त्यात ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांच्या व माझ्या विचारात बराच फरक होईल असे मला वाटते. ज्यांनी या चढाओढीमध्ये भाग घेतला त्यांचे कार्य मोठ्या उत्सुकतेचे झाले असे त्यांचे त्यांना देखील वाटत असेल असं म्हणवत नाही. तथापि आपले वक्तृत्त्व फार

जनता : १७ जानेवारी १९४८.