राजकारणाच्या दोऱ्या विद्येशिवाय हाती येणार नाहीत ८५
उत्कृष्ट झाले नाही म्हणून निरुत्साही होण्याचे फारसे कारण नाही. हा तुमचा पहिलाच प्रसंग असेल. ज्यांनी कंबर कसून एवढ्या श्रोतृसमुदायापुढे बोलण्याचे धैर्य दाखविले ते कौतुकास पात्र आहेत.
वक्तृत्व ही एक कला आहे. ती दीर्घोद्योगाने कमवावी लागते. काही जणांना ती उपजतही येत असेल. महाराष्ट्रात नामदार गोखले पट्टीचे वक्ते होते. याबद्दल कोणीही शंका घेणार नाही. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात नामदार गोखले प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यावेळी कोणातरी पाहुण्याचे व्याख्यान त्या कॉलेजमध्ये झाले. त्या पाहुण्याचे आभार मानण्याचे काम नामदार गोखल्यांकडे सोपविले होते. नामदार गोखल्यांनी आपले भाषण लिहून काढले होते. एवढेच नव्हे तर पाठही केले होते. पण त्यावेळी कोणीतरी खूण केली आणि नामदार गोखले गोंधळून गेले; नि १-२ मिनिटातच सभागृहाबाहेर पडले.
या गोष्टीमुळे त्यांना अद्दल घडून आली. मेकॉले नावाच्या ग्रंथकर्त्याची. पुस्तके नामदार गोखलेंनी मुखोद्गत करण्याचा सपाटा चालविला. सर्वच्या सर्व मेकॉले त्यांना अगदी तोंडपाठ होता.
मुंबईचे सर मेथा प्रसिद्ध वक्ते म्हणून गणले जातात. ते आपली भाषणे लिहून काढून तोंडपाठ करीत असत. त्यांच्या हॉलच्या सर्व बाजूला आरशे असत. भाषण करताना, आपले आविर्भाव ते आरशात पाहात असत. एवढेच नव्हे तर आपल्या मिशा, आपले केस, आपले हातवारे कसे दिसतात हे त्या आरशाच्या हॉलमध्ये ते पाहात असत. |
सध्या मिस्टर चर्चिलना हाउस ऑफ कॉमन्समध्ये इंग्रजी भाषेवर मोठे प्रभुत्व असलेला, असे मानतात. ते देखील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जाण्यापूर्वी आपले भाषण लिहून नेतात. चर्चिल आयत्यावेळी बोलणारा वक्ता नव्हे. प्रेक्षकांकडून उद्गारवाचक शब्द निघावेत, आपल्याला कुशाग्रणी गणण्यात यावे यासाठी तो शेलके वाकप्रचार आपल्या शर्टच्या स्टिक् कफावर लिहून नेत असतो. कोणी विरोध केला तरच चर्चिल भाषणात रंगतो. हे मिस विकिलसनला माहीत होते. तेव्हा मजूरपक्षाने त्यांच्या भाषणाला विरोध करून त्यास रंगण्याची संधी द्यावयाची नाही असे ठरविले. त्यावेळी चचिलचे भाषण अगदीच निष्प्रभ ठरले.
तेव्हा तुम्ही देखील निराश होण्याचे काही कारण नाही. लोकसत्ताक राज्य असलेल्या युगात उत्कृष्ट वक्तृत्वाची फार आवश्यकता आहे. जो शत्रुची देखील आपल्या प्रभावी वक्तृत्वाने मने वळवून घेतो तोच महापुरूष होय.
ही कला अवगत होण्यासाठी अविरत श्रम केले पाहिजेत. मी देखील प्रथमत: भेदरट होतो. एलफिन्स्टन कॉलेजमध्ये मी जेव्हा प्रोफेसर होतो त्यावेळी