१४-१-१९४८ राजकारणाच्या दोऱ्या विद्योशिवाय हाती येणार नाहीत - Page 125

राजकारणाच्या दोऱ्या विद्येशिवाय हाती येणार नाहीत ८७

ह्या नाइट स्कूलचा फायदा तुम्हाला फक्त कारकून होण्यासाठी होणार नसून त्यामुळे तुम्ही माऱ्याच्या जागादेखील काबीज करण्यासाठी होणार आहे. रात्रीच्या शाळेचा प्रयत्न स्तुत्य आहे. या शाळेला मला जे जे सहाय्य देता येईल ते मी जरूर देईन. वार्षिक एक हजार रूपयांची ग्रँट नाईट स्कूलला देण्याचे मी निश्‍चित केले आहे. तसेच जे काही २००-३०० रुपये क्रमिक पुस्तकांसाठी लागतील तेही देईन; म्हणजे जे जे म्हणून मला देता येईल ते सर्व काही देईन. तुम्ही सर्वांनी याचा फायदा करून घेतला पाहिजे.

तुम्ही स्वच्छ राहिले पाहिजे. मला येथे काही झकपक कपडे घातलेले विद्यार्थी दिसले. कुठल्याशा मॅगझीनच्या अंकात जे आर्टिकल ' महार व महाराष्ट्र ' समग्र छापले आहे त्यात महारांच्या झकपक पोषाखाबद्दल लिहिले आहे. ती वस्तुस्थिती नसून स्तुती आहे. ' एक नूर आदमी व दस नूर कपड़ा ' अशी म्हण आहे. बाहेर पडताना तुमचा पोषाख स्वच्छ पाहिजे. कपडा पाहूनच तुमच्याबद्दल प्रथम आदर वाटला पाहिजे.

माझा बराच पैसा कपड्यावर जातो. माझे शर्ट, पँटं नि कॉलर किती आहेत याचा मला देखील अंदाज नाही. एवढे खरे की माझे कपडे डझनांनी भरतील. त्यांचा इतका कंटाळा आला आहे की वाटते एक दिवस त्या सर्वांचा लिलाव करावा.

जसे तुम्ही स्वच्छ राहिले याहिजे तसे स्वाभिमानानेही राहिले पाहिजे. ' पाटील मी तुमच्या जोड्यातलाच आहे ' हे विचार सोडून दिले पाहिजेत. मरण बरे पण उपमर्द सहन करणार नाही, असे तुम्ही म्हटले पाहिजे.

तुम्ही भरपूर वाचन केले पाहिजे. रोज एक अर्धे पुस्तक संपविण्याचा सराव तुम्ही केला पाहिजे. आपली नवी इमारत झाली म्हणजे १०००-२००० विद्यार्थ्यांची सोय होईल, असे काही करता येईल. दिवसभर काम करून रात्री ८ ते १० पर्यंत तुम्ही शिक्षण घेता हे भूषणावह आहे. तुम्हास मी यश प्राप्ती

चिंतितो. |