मी पाषाणासारखा घटट, .. .. . ढेकळासारखे विरून जाल ९३
मी मध्यवर्ती सरकारात गेलो असलो तरी काँग्रेसचा सभासद झालो नाही. तसा माझा विचारही नाही. मध्यवर्ती सरकारात येण्याबद्दल मला
काँग्रेसकडून आमंत्रिण्यात आले व मीही काँग्रेस सरकारमध्ये विनाअट प्रवेश
केला.
मो दगडासारखा घट्ट असल्यामुळे पाण्यात विरघळण्याची मला मुळीच भीती
नाही, म्हणून मी काँग्रेसमध्ये सामील झालो तरी माझ्यावर काहीही परिणाम होणार
नाही. परंतु, तुमची स्थिती मात्र वेगळी आहे. पाण्यात पडलेल्या ढेकळासारखे
तुम्ही विरून जाल. तेथे राहाणे निरुपयोगी आहे असे मला वाटले तर मी केव्हाही
बाहेर पडेन, |
परिस्थितीच अशी आहे की, राज्यकारभारात यावेळी आपली माणसे असणे अत्यावश्यक आहे. चांगल्या कायद्यापासून धोक्याची शक्यता नाही हे खरे आहे परंतु चांगल्या कायद्याची दुष्ट अंमलबजावणी केली जाण्याचा
संभव आहे. अशावेळी अस्पृश्यांविरुद्ध वागण्याची ज्यांची परंपरा आहे अशी
माणसे अधिकारावर असली तर ते आपल्या भवितव्याच्या दृष्टीने वाईट
आहे.
सक्तीच्या श्रमाला कायद्याचे अधिष्ठान नाही. परंतु जमीनदार ती पद्धत
अंमलात आणीत आहेत. कित्येक ठिकाणी अशा अत्याचारी लोकांचे नातेवाईक
अधिकारावर असल्यामुळे अस्पृश्यांनी त्यांचेविरुद्ध केलेले अर्जही ह्या अधिकाऱ्यांकडून
दडपले जातात. ह्या ठिकाणी जर अस्पृश्य अधिकारी असते तर त्यांनी आपल्या
बांधवांच्या हक्कांचे खचित् रक्षण केले असते.
जर मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे ठरविले तर तशी उघड घोषणा
करीन. अस्पृश्यांच्या हिताची ती गोष्ट असेल तर तुम्हालाही तसे करण्यास मी
सांगेनच पण जोपर्यंत मी तुम्हाला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबद्दल प्रकट आवाहन
केलेले नाही तोपर्यंत मात्र काँग्रेसमध्ये जाऊ नका ! असा उपदेश करून
डॉक्टर साहेबांनी आपले भाषण संपविले.
विरोधासाठी विरोध मला मान्य नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वरील भाषणावर विपर्यास करणारे [वृत्त ] [एका ]
वृत्तपत्राने प्रकाशित केले. त्यावर डॉ. बाबासाहेबांनी आपले निवेदन दिले. ते
जनतेच्या दिनांक ८ मे १९४८ च्या अंकात [प्रसिद्ध ] [झाले. ] ते येणेप्रमाणे--
माझ्या भाषणावर विपर्यास करणारा [वृत्तांत ] [पाहून ] [व ] [मंत्रिमंडळातील ] [माझ्या ]
सहकाऱ्यांसंबंधी मी काही अनुचित उद्गार काढल्याचे एका [स्थानिक ] [वृत्तपत्राने ]
दिलेले वृत्त वाचून मला अतिशय [खेद ] [झाला. ]
७. चि (वाय) ४११--८