मी पाषाणासारखा घड, . . . . . डेकळासारखे विरून जाल ९५
होतो. सवर्ण अधिकारी ह्या कारभारात भरले असल्याने राजवटीला दलित वर्गाविषयी सहानुभूती नाही. या सर्व गोष्टी विचारात घेऊन. मी सरकारात सामील झालो.
आता तिसरा मुद्दा. काँग्रेसला मिळण्यात काही अर्थ नाही, असे मी म्हणालो. तिसरा पक्ष असणेच जास्त सुरक्षिततेचे ! सरकार झोटिंगशाही बनण्याचा धोका असतो.
सध्याच काँग्रेसमधून समाजवादी बाहेर पडून, काँग्रेस व समाजवादी असे दोन पक्ष तयार झालेत, तेव्हा काँग्रसला मिळायचे की काय हा आपणापुढे प्रश्न नाही. काँग्रेसला गिळावयाचे की समाजवाद्यांना, हा खरा प्रश्न आहे. समाजवादी पक्ष प्रबळ होण्याची शक्यता आहे. तेव्हा मी असा सल्ला दिला की या दोन्ही पक्षांचा समतोलपणा राखून त्यादृष्टीने त्यांच्यापासून फायदा उठणारी सत्ता म्हणून आपण तिसरा पक्ष स्थापावा. केवळ अनुयायांच्या स्वरूपात एखाद्या राजकीय पक्षाला जाऊन मिळण्यात स्वारस्य नाही. त्यायोगे फार तर आपण अधिकारावर चढू पण त्याने सत्ता अथवा अधिकार मिळतीलच असे नाही.
या अनुषंगाने बोलताना मी म्हणालो की लोकसंख्येच्या प्रमाणात पाहाता, संयुक्त प्रांतात तुम्हाला २२ टक्क्यांच्या आसपास नोकऱ्यात राखीव जागा मिळणे आवश्यक असता, अवध्या १० टक्क्यांवर तुमची बोळवण करण्यात आल्याबद्दल तुम्ही एका ठरावाने आताच पंत मंत्रिमंडळाचा निषेध केलात. तुम्हाला हव्या असलेल्या राखीव जागा पंत तुम्हाला का देत नाहीत ? कारण संयुक्त प्रांतिक विधिमंडळात आपणाला हव्या असणाऱ्या बहुमतासाठी पं. पंत तुमच्यावर अवलंबून नाहीत, हे होय. वाटाघाटी करण्यालायक वेगळी पण प्रबळ अशी संघटना स्थापूनच तुम्हाला या २२ टक्क्याची पंतांकडे मागणी करता येईल आणि आपणाला यांच्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे, हे ध्यानी घेऊन
पंत त्यास मान्यता देतील.
यानंतर मी मागासलेल्या जमाती व दलित वर्ग यांच्या ऐक्याच्या प्रश्नासंबंधी बोललो. हे दोनही मिळून देशाची बहुसंख्या बनते. त्यांना या देशावर राज्य करता येणार नाही का ? राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी त्यांनी संघटित होण्याचाच काय तो अवकाश आणि आता प्रौढ मतदानाने निवडणुकी होणार असल्याने हेही कठीण नाही. काँग्रेस सरकार इथे कायमचे राहणार आहे या भावनेने जनता धैर्यशाली बनू शकत नाही असे दिसते. ही चुकीची विचारसरणी