२५५
खरेच, संविधानांतर्गत काही चुकीच्या गोष्टी घडल्या
तर त्यास संविधान जबाबदार नसेल;
माणसाची दुष्टता जबाबदार असेल
“ संविधान सभेत दिनांक २९ ऑगस्ट १९४७ रोजी श्री सत्यनारायण सिन्हा यांनी मांडलेल्या ठरावाप्रमाणे पुढील सात सभासदांची मसुदा समिती गठित करण्यात यावी असा ठराव सभेने एकमताने मंजूर केला. सभासद पुढील प्रमाणे--
१. अल्लादी कृष्णास्वामी अय्यर
२. एन. गोपालस्वामी अयंगार |
३. डॉ. बी. आर. आंबेडकर
४. श्री. के. एम, मुन्शी
५. सैयद मोहमद सादुल्ला
६. बी. एल, मित्तल
७. डी. पी. खेतान ''*
' डॉ. आंबेडकरांना दि. ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून एकमताने निवडण्यात आले. त्यानंतर या समितीची पहिली बैठक दिनांक २७ ऑक्टोबर १९४७ रोजी घेण्यात आली. मधल्या २ महिन्यांच्या काळात संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे एक पत्र मसुदा समितीला म्हणजे डॉ. आंबेडकरांना आले. हे पत्र बैठकीत सादर करण्यात आले. या पत्रात म्हटले होते की, संविधान सभेची बैठक डिसेंबरच्या मध्यात होणार असल्यामुळे रावांचा ड्राफ्ट सर्व सदस्यांना वितरीत करण्यात यावा. यावर डॉ. आंबेडकरांसहित. सर्व सदस्यांनी मत नोंदविले की, असे करण्याची आवश्यकता नाही, कारण हा ड्राफ्ट व उपसमित्यांचे रिपोर्ट लक्षात घेऊन संविधानाचा नवा मसुदा करायचा आहे. OO
मधल्या काळात म्हणजे ३० आँगस्ट १९४७ नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कार्यालयाने तयार केलेल्या मसुद्यातील सर्व कलमांचे निरिक्षण करूत्त स्वतःची शब्दरचना असलेली कलमे तयार केली होती. दिनांक २७ ऑक्टोबर १९४७ पासून घटना सल्लागाराच्या कार्यालयाने तयार केलेल्या मसुद्यावर कलमवार [चर्चा ] झाली. त्यात कोणते कलम बदलावे, कोणते वाढवावे, [शब्दरचना ] [कोणत्या ] कलमाची बदलावी यावर भराभर निर्णय [घेण्यात ] [आले. ] [“२ ]
१ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पिचेस, खंड १३, पृष्ठ क्रमांक २९. २ फुले-आंबेडकर संशोधनातील प्रदुषणे : लेखक वसंत मून, पृ. २१.