९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
संविधान सभेला मसुदा सादर करताना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेद्र प्रसाद यांना मसुद्यासोबत एक पत्रही दिले होते. त्यात त्यांनी मसुदा समितीची भूमिका विशद केली होती. ते पत्र पुढीलप्रमाणे--
'' नवी दिल्ली,
२१ फेब्रुवारी १९४८.
प्रति,
सन्माननीय अध्यक्ष,
भारतीय संविधान संभा,
नवी दिल्ली.
प्रिय महोदय,
प्रस्तावना.--संविधान सभेने २९ ऑगस्ट १९४७ रोजी पारित केलेल्या ठरावान्वये नियुक्त केलेल्या मसुदा समितीने तयार केलेला भारताचा नवीन संविधान मसुदा समितीतर्फे मी सादर करीत आहे
समिती सभासदांच्या वतीने जरी मला स्वाक्षरी करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला असला तरी समितीच्या सर्व सभांना सर्व सभासद हजर नसत, परंतु ज्या सभांमध्ये निर्णय घेण्यात आले त्या प्रत्येक सभेत आवश्यंक गणसंख्या असायची आणि निर्णय एकतर एकमताने किंवा उपस्थित सभासदांच्या बहुमताने घेण्यात यायचे.
मसुदा तयार करताना मसुदा समितीने संविधान सभेने घेतलेल्या निर्णयांची किंवा संविधान सभेने नियुक्त केलेल्या समित्यांच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा होती. होताहोईस्तो मसुदा समितीने याचे पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु काही बाबी अशा होत्या की ज्यात बदल करणे गरजेचे आहे असे मंसुदा समितीला वाटले. अशाप्रकारचे सर्व बदल अधोरेखित करून किंवा संबंधित भागाच्या बाजूला उल्लेख करुन दर्शविलेले आहेत. प्रत्येक बदल स्पष्ट करण्यासाठी तळटीप देण्याची काळजी सुद्धा मसुदा समितीने घेतली आहे. परंतु विषयाचे महत्त्व लक्षात घेता या महत्त्वाच्या बदलांकडे आपले आणि संविधान सभेचे लक्ष वेधणे योग्य होईल, असे मला वाटते.
२. उद्देशपत्रिका.--जानेवारी १९४७ ला संविधान सभेने स्वीकारलेला उद्दिष्ट ठराव उद्घोषित करतो की, भारत एक सार्वभौम, स्वतंत्र गणराज्य असेल,