खरेच, संविधानांतर्गत काही. . .. . . दुष्टता जबाबदार असेल १०५
राज्यसभेत जिथे राज्यांचे घटक म्हणून प्रतिनिधीत्व असते तिथे, २/३ बहुमताने
या संदर्भात ठराव पारित झाल्यास केंद्राला तसे करता येईल.
(ब) शेतजमिनीव्यतिरिक्त इतर संपत्तीवरील वारसा हक्काचाच नव्हे तर
वारसाहक्काशी संबंधित सर्व विषयांचा सामायिक सूचित अंतर्भाव करणे
योग्य होईल असा समितीने विचार केला आहे. त्याचप्रमाणे ज्या बाबी विविध
प्रकारच्या वैयक्तिक कायद्यांनी सध्या ठरतात त्या सर्व बाबींचा अंतर्भाव
समितीने समवर्ती सूचित केला आहे. यामुळे यासंबंधी भारतात एक समान
कायदा निर्माण करणे सोईचे होईल.
(क) केंद्राच्या उपयोगासाठी भूमी संपादनाचा कायदा केंद्र सूचित आणि
राज्याच्या उपयोगासाठी भूमी संपादनाचा कायदा राज्य सूचित अंतर्भूत केला
आहे. समितीने असे सुचविले आहे की, ज्या तत्त्वावर संपादित केलेल्या
भूमीची भरपाई निश्चित केली जाईल अशा सर्व प्रकरणांचा समावेश समवर्ती
सूचित राहील की जेणेकरुन याबाबत एकवाक्यता निर्माण होऊ शकेल.
याशिवाय सध्याची वैचित्र्यपूर्ण परिस्थिती पाहता जिथे आवश्यक वस्तुंच्या
पुरवठ्यावर केंद्राच्या नियंत्रणाची गरज आहे, त्याबाबत समितीने असे सुचविले
आहे की संविधानाची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून पाच वर्षांच्या ठराविक
कालावधीसाठी आवश्यक वस्तुंचे उत्पादन, पुरवठा व वितरणाच्या,
त्याचप्रमाणे विस्थापित लोकांच्या मदत आणि पुनर्वसनासाठी आवश्यक वस्तुंचा
व्यापार व वाणिज्य समवर्ती सूचीतील विषयांप्रमाणेच राहील. हे धोरण
स्वीकारताना समितीने भारत कायदा १९४६ च्या (केद्रीय सरकार आणि
विधिमंडळ) कायद्यातील तरतुदींचे अनुसरण केले आहे.
अनुच्छेद २४७ ते २६९ :
१५. वित्तीय तरतूदी.--व्यापक दृष्टीने विचार करता केंद्र आणि राज्ये यातील महसूलाच्या वितरणाशी संबंधित बाबींशिवाय, तज्ञ वित्त समितीने केलेल्या सर्व शिफारशी मसुदा समितीने मसुद्यात अंतर्भूत केल्या आहेत. या क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेले अस्थिर वातावरण पाहता मसुदा समितीने असा विचार केला आहे की, येत्या पाच वर्षांच्या काळाकरिता महसुलाच्या वितरण क्षेत्रात जैसे थे स्थिती कायम ठेवणेच योग्य होईल. शेवटच्या वर्षी वित्त आयोग परिस्थितीचा आढावा घेवू शकेल.
अनुच्छेद २८१ ते २८३ :
१६. सेवा.--सेवांशी संबंधित सखोल तपशीलवार तरतुदी संविधानात अंतर्भूत करण्याचे समितीने टाळले आहे. संवैधानिक तरतुदी करण्यापेक्षा सुयोग्य विधिमंडळांनी कायदे करुन त्याचे नियमन करावे असा समितीने