खरेच, संविधानांतर्गत काही. . . . . . दुष्टता जबाबदार असेल १०७
२२. श्री. अल्लादी कृष्णास्वामी अय्यर यांनी काही मुद्यांबाबत (कोणताही तात्त्विक प्रश्न निर्माण होऊ न देता) एक स्वतंत्र तयार केलेले टिपण त्यांच्या विनंतीनुसार मसुद्यात जोडले आहे.
२३. हे अवघड कार्य पार पाडीत असताना समितीला संवैधानिक सल्लागार श्री. बी. एन. राव, उपसचिव आणि मसुद्याचा आराखडा तयार करणारे श्री. एस. एन. मुखर्जी आणि संविधान समिती सचिवालयाचा कर्मचारी वर्ग यांनी केलेल्या सहकार्याच्या प्रति समितीची कृतज्ञता नमूद न करता हे मसुदा संविधान मी आपणास सादर करु शकत नाही.
आपला विश्वासू ,
बी. आर. आंबेडकर.'' १
संविधानाचा मसुदा दिनांक २६ फेब्रुवारी १९४८ ला भारत सरकारच्या गॅझेट मध्ये लोकांच्या माहितीसाठी व लोकांची मते जाणून घेण्यासाठी प्रकाशित करण्यात आला. लोकांपुढे तो जवळपास आठ महिने होता. त्यानंतर ४ नोव्हेंबर १९४८ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तो संविधान सभेला सादर केला. याप्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणाला संविधान सभेच्या आणि देशाच्याही इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या भाषणाचा परिणाम म्हणूनच संविधान सभेच्या बहुतेक सदस्यांनी डॉ. आंबेडकरांची एक व्यासंगी, घटनेचा सखोल अभ्यासक आणि अधिकारवाणीने संविधानावर भाष्य करणारा, संविधान निर्मितीची क्षमता असणारा संविधानकार अशी प्रशंसा केली. काही निवडक सदस्यांच्या या संदर्भातील भावना व्यक्त करणाऱ्या भाषणातील काही भाग पुढील
प्रमाणे--
'' ठी. टी. कृष्णम्माचारी--सभागृहाला जाणीव असेल की, तुम्ही नियुक्त केलेल्या सात सदस्यांपैकी एकाने राजीनामा दिला व त्याचे जागी दुसरा नेमण्यात आला. एक सदस्य मरण पावले व ती जागा भरण्यातच आली नाही. एक सदस्य दूर अमेरिकेत होते व त्यांचीही जागा कोणी भरली नाही व दुसरा एक जण संस्थानाच्या कारभारात गुंतलेला होता व तेवढ्यापुरती तीही जागा [रिकामी ] होती. एक किंवा दोन सदस्य दिल्लीपासून बरेच दूर राहत व [प्रकृती ] अस्वास्थ्यामुळे हजर राहू शकले नाहीत. तेव्हा हे संविधान तयार करण्याचे ओझे ` अंतिमतः डॉ. आंबेडकरांवर पडले व त्यांनी हे जबाबदारीचे [काम ] [यशस्वीरीत्या ] पार पाडले. हे त्यांचे कार्य निःसंशय प्रशंसनीय आहे [व ] [याबद्दल ] [आपण ] [सर्व ] [त्यांचे ] ऋणी आहोत.
१ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पिचेस, खंड १३, पृष्ठ ९५ ते १०४.