४-११-१९४८ खरेच, संविधानांतर्गत काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्यांस संविधान जबाबदार नसेल; माणसाची दृष्टता जबाबदार असेल - Page 149

खरेच, संविधानांतर्गत काही. . . . . . दुष्टता जबाबदार असेल १११

कार्यकारी मंडळ हे असांसदीय आहे. याचा अर्थ, स्वत:च्या अस्तित्वाकरिता ते काँग्रेसमधील बहुमतावर अवलंबून नाही. याउलट इंग्लंडमध्ये संसदीय कार्यकारी मंडळ आहे, याचा अर्थ त्याचे अस्तित्व संसदेतील बहुमतावर अवलंबून आहे. असांसदीय कार्यकारी मंडळ असल्याने अमेरिकेतील काँग्रेस त्या कार्यकारी मंडळाला बरखास्त करू शकत नाही. सांसदीय शासनाला मात्र सभागृहातील बहुसंख्य सभासदांचा विशवास गमावल्याक्षणी राजीनामा द्यावाच लागतो. जबाबदारीच्या दृष्टिकोनातून पाहता असांसदीय कार्यकारी मंडळ हे संसदेशी संबंधित नसल्याने ते विधिमंडळाला कमी जबाबदार असते. याउलट संसदीय कार्यकारी मंडळ हे संसदेतील बहुमतावर अधिक अवलंबून असल्याने ते अधिक जबाबदार असते. सांसदीय पद्धती ही असांसदीय पद्धतीपेक्षा अधिक जबाबदार असते एवढाच या दोन्हीत फरक आहे असे नसून त्यांच्या जबाबदारीचे मूल्यमापन करण्याचा काळ आणि यंत्रणा याबाबतीतही त्या भिन्न आहेत. असांसदीय शासनपद्धतीत, जी अमेरिकेत अस्तित्वात आहे, कार्यकारी मंडळाच्या जबाबदारीचे मूल्यमापन कालबद्ध असते. ते दोन वर्षातून एकदा होते. ते मतदारांकडून

केले जाते. संसदीय शासनपद्धती असलेल्या इंग्लंडमध्ये कार्यकारी मंडळाच्या

जबाबदारीचे मूल्यमापन दैनंदिन व कालबद्ध अशा दोन्हीप्रकारे होते. प्रश्‍न,

ठराव, अविश्वास प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव आणि भाषणांवरील चर्चा या माध्यमातून

सभागृहातील सदस्य दैनंदिन मूल्यमापन करतात. कालबद्ध मूल्यमापन दर

पाच वर्षांनी किंवा त्यापूर्वीही होणाऱ्या निवडणुकीच्या वेळी मतदारांकडून

होते. असे म्हटले जाते की, अमेरिकेत अस्तित्वात नसलेले जबाबदारीचे

दैनंदिन मूल्यमापन कालबद्ध मूल्यमापनापेक्षा अधिक परिणामकारक असून

भारतासारख्या देशाला त्याची अधिक गरज आहे. कार्यकारी मंडळाचा

विचार करताना संसदीय पद्धतीची शिफारस करून मसुदा संविधानाने

स्थिरतेपेक्षा जबाबदारीच्या तत्त्वाला प्राधान्य दिले आहे.

मी आतापर्यंत मसुदा संविधानातील शासनाच्या प्रकाराचे विवरण केले

आहे. आता मी संविधानाचा प्रकार या दुसऱ्या प्रश्‍नाकडे वळतो.

इतिहासात संविधानाचे दोन प्रमुख प्रकार आढळतात. एक संघीय

(Unitary) आणि दुसरा संयुक्त संघीय (९५९३). संविधानाची दोन

अंगभूत वैशिष्ट्ये आहेत. (१) केन्द्रस्थानी सर्वाधिकार असणे आणि

(२) सहाय्यक सार्वभौम सत्तांचा अभाव. याउलट संयुक्त संविधानात : (१) केन्द्रीय सत्तेसोबतच सहाय्यक सत्ता अस्तित्वात असणे आणि (२) यातील "प्रत्येक सत्ता नेमून दिलेल्या क्षेत्रात सार्वभौम असणे या बाबी अंतर्भूत

आहेत. दुसऱ्या शब्दात संयुक्त संविधान म्हणजे दोन सत्ता केन्द्रे अस्तित्त्वात