खरेच, संविधानांतर्गत काही. ... . . दुष्टता जबाबदार असेल ११७
२/३ बहुमताने पारित केल्यानंतर केन्द्र सरकारला त्या संदर्भात कायदा करता येईल. राष्ट्रीय आणीबाणीच्या प्रसंगी संसदेला अशाच प्रकारचा अधिकार अनुच्छेद २२७ अन्वये देण्यात आला आहे. प्रांतांनी संमती दिल्यास संसदेला अशा अधिकारांचा उपयोग करण्याचे प्रावधान अनुच्छेद २२९ मध्ये करण्यात आले आहे. शेवटच्या तरतूदीचा समावेश ऑस्ट्रेलियाच्या संविधानात असला तरी सुरुवातीच्या दोन मात्र मसुदा संविधानाची खास वैशिष्ट्ये आहेत.
ताठरपणा आणि कायदेशीरपणा कमी करण्यासाठी स्वीकारलेला दुसरा उपाय म्हणजे संविधानात दुरुस्तीसाठी केलेली तरतूद होय. संविधानात दुरुस्ती करण्यासाठी केलेल्या संविधानातील अनुच्छेदांची दोन भागात विभागणी होते. पहिल्या भागात (अ) केन्द्र आणि राज्यांमध्ये कायदे करण्याच्या अधिकारांची विभागणी, (ब) संसदेमध्ये राज्यांना दिलेले प्रतिनिधीत्व आणि (क) न्यायालयांचे अधिकार, यांच्याशी संबंधित अनुच्छेद आहेत. इतर सर्व अनुच्छेदांचा समावेश दुसऱ्या भागात केला आहे. दुसऱ्या भागातील अनुच्छेदांनी संविधानाचा बराच भाग व्यापलेला असून संसदेला दोन प्रकारच्या बहुमताने त्यात दुरुस्ती करता येईल : प्रत्येक सभागृहाच्या उपस्थित असलेल्या आणि मतदानात भाग घेतलेल्या सभासदांच्या २/३ बहुमताने, आणि प्रत्येक सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने, या अनुच्छेदातील दुरुस्तीसाठी राज्यांच्या अनुसंमतीची आवश्यकता नाही. केवळ पहिल्या भागातील कलमांच्या दुरुस्तीसाठी मात्र अधिकची सुरक्षा म्हणून राज्यांच्या अनुसंमतीच्या अटीची तरतूद केली आहे
त्यामुळे कोणीही बिनदिक्कतपणे असे म्हणू शकेल की, कायदेशीरपणा व ताठरपणा या दोषांचा भारतीय संघराज्यावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ते लवचिक संघराज्य आहे.
इतर संघराज्यांच्या तुलनेत प्रस्तावित भारतीय संघराज्याचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य आहे. संघराज्य हे स्वतंत्र कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायिक अधिकार ह्या बाबतच्या विभाजित अधिकारांवर आधारित असल्यामुळे, प्रत्येक सत्ताकेन्द्रात कायदा, प्रशासन आणि न्यायिक संरक्षण यात अपरिहार्यपणे
भिन्नता निर्माण होते. विशिष्ट मर्यादेपर्यंत अशा भिन्नतेचा अनुचित परिणाम होत
नाही. स्थानिक गरजा आणि परिस्थिती लक्षात घेता शासनाला कायदे
करण्यासाठी याचे स्वागतही करता येवू शकेल. परंतु हीच भिन्नता विशिष्ट
मर्यादेनंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरु शकते आणि
अनेक संघराज्यांमध्ये अशा प्रकारची गोंधळाची परिस्थिती तिने निर्माण केली