खरेच, संविधानांतर्गत काही. . . . . . दुष्टता जबाबदार असेल १२१
लोकसत्ताक संविधानाच्या शांततामय अंमलबजावणीसाठी घटनात्मक नेतिकतेच्या प्रसाराची गरज प्रत्येकजणच मान्य करतो, परंतु त्याच्याशी परस्परनिगडित असलेल्या दोन बाबींना मात्र दुर्दैवाने सर्वसाधारणपणे मान्य केले जात नाही. त्यातील पहिली म्हणजे प्रशासकीय स्वरूपाचा संविधानाच्या स्वरूपाशी निकट संबंध असतो. प्रशासनाचे स्वरूप हे संविधानाच्या स्वरूपाशी घनिष्टतया सुसंगत असले पाहिजे आणि दुसरी बाब अशी की, संविधानाच्या स्वरूपात बदल न करता केवळ प्रशासकीय यंत्रणेत बदल करुन त्याद्वारे संविधानाच्या हेतूला निष्प्रभ आणि विरोध करुन संविधानाच्या अंमलबजावणीत अडथळे आणणे हे पूर्णत: शक्य आहे. इतिहासकार ग्रोटनी म्हटल्याप्रमाणे, ज्याठिकाणी लोकांमध्ये घटनात्मक नीतिमत्ता रुजलेली आहे, त्याठिकाणी प्रशासकीय तपशिलांना संविधानातून वगळून ते कायदेमंडळावर सोपविण्याची जोखीम स्वीकारता येते. प्रश्न असा आहे की, अशी घटनात्मक नैतिकता लोकांच्या अंगी बाणली आहे असे-आपण गृहित धरु शकतो काय ? घटनात्मक नेतिकता ही नैसर्गिक भावना नाही. तिची जोपासना करावी लागते. अजूनही आपल्या लोकांमध्ये ती निर्माण झाली नाही आपण हे समजले पाहिजे. भारतातील लोकशाही ही भारताच्या मातीवरील केवळ वरचे आवरण आहे. ही माती मूलतः अलोकतांत्रिक आहे.
अशा परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा निर्माण करण्याच्या सुचनांसाठी कायदेमंडळावर विशवास ठेवणे शहाणपणाचे ठरणार नाही. संविधानात त्यांचा समावेश करण्यामागील ही भूमिका आहे.
मसुदा संविधानावर करण्यात येत असलेला दुसरा आरोप असा की, यातील कोणत्याही भागात प्राचीन भारतीय राज्यव्यवस्थेचे प्रतिबिंब कुठेच दिसत नाही. असे म्हटले जाते की, भारतीय संविधानाची निर्मिती प्राचीन हिंदू ` राज्यव्यवस्थेला अनुसरुन असावयास हवी होती. पाश्चात्य सिद्धांतांचा समावेश न करता नवीन संविधानाची ग्राम पंचायती आणि जिल्हा पंचायतीच्या प्रारुपावर उभारणी आणि निर्मिती व्हावयाला हवी होती. इतर काहीजण असे आहेत की, ज्यांनी पराकोटीची टोकाची भूमिका घेतली आहे. त्यांना कोणतीही केन्द्रीय किंवा प्रांतिक सरकारे नकोत. त्यांना भारतात केवळ जास्तीत जास्त ग्राम सरकारे हवी आहेत. भारतीय विद्वानांचे ग्रामीण समाजातील लोकांप्रती असलेले प्रेम करुणाजनक नसले तरी अमर्याद आहे. (हंशा !) असे घडण्याचे प्रमुख कारण म्हणजे मेटकाफने केलेली [त्यांची ] [(ग्राम ] [पंचायत ] [व ] [जिल्हा ] [पंचायत) ] ' स्तुति होय. त्याने त्यांचा लहान लहान प्रजासत्ताके [म्हणून ] [उल्लेख ] [केला, ] ज्यात त्यांना हवी असलेली प्रत्येक वस्तू त्यांच्यामधूनच [उपलब्ध ] [होईल. ] तसेच त्यांचा इतर बाह्य जगाशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहाणार नाही.