४-११-१९४८ खरेच, संविधानांतर्गत काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्यांस संविधान जबाबदार नसेल; माणसाची दृष्टता जबाबदार असेल - Page 165

खरेच, संविधानांतर्गत काही. . . . . . दुष्टता जबाबदार असेल १२७

लागेल. तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. त्यांच्या उल्लंघनासाठी त्याला न्यायालयात जाब द्यावा लागणार नाही. परंतु निवडणुकीच्या वेळी त्याला मतदारांसमोर याचे निश्‍चितच उत्तर द्यावे लागेल. सत्ता प्राप्तीसाठी विविध शक्तींकडून ज्यावेळी प्रयत्न होतील त्यावेळी मार्गदर्शक तत्त्वे किती मौल्यवान आहेत याची जाणीव होईल

अनुदेशांच्या पाठिशी अंमलबजावणीच्या बंधनकारकतेची तरतूद नसल्यामुळे संविधानात त्यांचा अंतर्भाव होण्याला विरोध करण्याचा युक्तिवाद योग्य नाही. संविधानात त्यांना नेमके कुठे स्थान द्यावे याबाबत मतभेद होऊ शकेल. ज्या तरतुदींच्या पाठिशी अंमलबजावणीची बंधनात्मकता नाही त्यांचा समावेश बंधनात्मकता असलेल्या तरतुदींच्या सोबत करणे हे काहीसे चमत्कारिक वाटेल हे मला मान्य आहे. माझ्या मते, त्यांचे योग्य स्थान, ` अनुसूची ॥। (अ) आणि ।४, ज्यात राष्ट्रपती आणि राज्यपालांना दिलेल्या अनुदेशांच्या संलेखात असायला हवे, कारण मी म्हटल्याप्रमाणे, कार्यकारी मंडळ आणि विधीमंडळांनी स्वतःच्या अधिकारांचा उपयोग कसा करावा यासाठीच खरे तर अनुदेशांच्या संलेखांची योजना आहे. पण ती केवळ व्यवस्थेची बाब आहे.

काही टीकाकांराच्या मते, केन्द्र सरकार फारच बलशाली झाले आहे. काहींच्या मते ते अधिक सामर्थ्यवान असावे. मसुदा संविधानाने सुवर्णमध्य साधला आहे. केन्द्राला शक्ती प्रदान करण्यासाठी तुम्ही कितीही विरोध केला, तरी केन्द्राला शक्तीशाली होण्यापासून तुम्ही परावृत्त करू शकत नाही, आधुनिक जगाची परिस्थिती अशी आहे की, सत्तेचे केन्द्रीकरण अनिवार्य आहे. एखाद्याने अमेरिकेतील केन्द्र सरकारच्याच वाढीचा विचार केला, तर असे दिसेल [की ] संविधानाने मर्यादित अधिकार दिल्यानंतरही, [आजवरच्या ] [वाटचालीत ] [त्याच्या ] [मूळ ] स्वरूपात बरीच वाढ झाली आहे आणि केन्द्र सरकारच्या अधिक [शक्तीशाली ] होण्यामुळे तेथील राज्यसरकारांच्या अधिकारांना [ग्रहण ] [लागले ] [आहे ] [असे ] दिसेल. हा आजच्या परिस्थितीचा परिणाम आहे. याच परिस्थितीचा भारत सरकारवरही निश्‍चितपणे परिणाम होणार आहे [आणि ] [कितीही ] [प्रयत्न ] [केला ] [तरी ] त्याला शक्तिशाली होण्यापासून [कुणी ] [रोखू ] [शकणार ] [नाही. ] दुसरीकडे, ते अधिकच शक्तिशाली होण्याच्या [प्रवृत्तीला ] [आपण ] [विरोध ] [केला ] [पाहिजे. ] जेवढे पचवता येईल त्यापेक्षा त्याने अधिक [खावू ] [नये. ] त्याची शक्ती त्याच्या वजनाशी

अनुरूप असावी. स्वतःच्या वजनानेच कोसळून पडेल [इतके ] [तिला ] [शक्तिशाली ]

बनविणे चुकीचे ठरेल.

मसुदा संविधानावर अशी टीका करण्यात येत आहे की, केन्द्र आणि प्रांतांच्या

संवैधानिक संबंधासाठी एका प्रकारची तरतूद आणि केन्द्र व संस्थाने यांच्यातील