खरेच, संविधानांतर्गत काही. . . . . . दुष्टता जबाबदार असेल १२९
इथे ६०० भारतीय संस्थाने अस्तित्वात होती. भारतीय संस्थानांच्या भारतीय प्रांतांसोबत आज झालेल्या एकत्रिकरणामुळे किंवा आपआपसातील विलिनीकरणामुळे किंवा केन्द्राने त्यांना केन्द्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यामुळे, आता टिकून राहू शकणारी अशी केवळ २० ते ३० संस्थानेच राहिली आहेत. ही अतिशय वेगवान प्रक्रिया आणि प्रगती होती. शिल्लक राहिलेल्या संस्थानांना मी आवाहन करतो की भारतीय प््रांतांप्रमाणेच त्यांनी भूमिका घ्यावी आणि भारतीय प्रांतांच्या व्यवस्थेप्रमाणेच भारतीय संघराज्याचे पूर्ण घटक व्हावे. यामुळे भारतीय संघराज्याला आवश्यक असणारी शक्ती ते प्रदान करतील. स्वतःच्या संविधान सभा निर्माण करणे आणि स्वतःची स्वतंत्र संविधाने निर्माण करणे या त्रासापासून ते स्वतःला वाचवतील आणि त्यांच्यासाठी जे मौल्यवान आहे त्यापैकी काहीही गमावण्याचा प्रसंग त्यांच्यावर येणार नाही. मी आशा करतो की, माझे आवाहन व्यर्थ जाणार नाही आणि संविधान पारित होण्यापूर्वी राज्ये आणि भारतीय संस्थाने. यांच्यातील भेद आपण नष्ट करू शकू.
काही टीकाकारांनी मसुदा संविधानातील अनुच्छेद १ मध्ये भारताचे वर्णन
युनियन ऑफ स्टेटस् म्हणून करण्यावर आक्षेप घेतला आहे. असे म्हटल्या
जाते की, फेडरेशन ऑफ स्टेट्स अशी शब्दरचना अश्चायला हवी.
हे खरे आहे की केन्द्रीभूत राज्य (Unitory States) असलेल्या- शिण
आफ्रिकेचे वर्णन: संघ (एला) असे केले जाते. परंतु फेडरेशन
असलेल्या कॅनडाचेही वर्णन संघ (107) म्हणूनच केले जाते. संविधान
फेडरल असले तरी भारताचे वर्णन संघ (107) केल्याने शब्दरघमेघ्या
उपयोगाला कोणंतीही हानी पोहोचत नाही. परंतु महत्त्वाचे आहे ते हे की, संघ
(७१०) या शब्दाचा उप्रयोग जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. कॅनडाच्या
संविधानातं ' संघ ' (७707) या शब्दाचा उपयोग का करण्यांत आलला हे मला .
माहित नाही. परंतु मसुदा समितीने तो का उपयोगात आणला ते मी- आपल्याला
सांगू शकतो. मसुदा समिती हे स्पष्ट करू इच्छित होती की, भारत जरी
फेडरेशन होणार असला तरी, राज्यांच्या आपसातील कराराची परिणती
म्हणून हे फेडरेशन अस्तित्वात आलेले नाही आणि फेडरेशन हा कराराचा
परिणाम नसल्याने कोणत्याही राज्याला त्यातून बाहेर पडण्याचा अधिकार
राहणार नाही. फेडरेशन हे युनियन आहे कारण ते अविध्व॑सनीय
आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी देशाची आणि लोकांची विविध राज्यांमध्ये
विभागणी करण्यात येत असली तरी देश पूर्णतः एकसंघ आहे, एकाच स्त्रोतातून
निर्माण झालेल्या एका सार्वभौम राज्याच्या अधिपत्याखाली राहाणारे हे लोक