१३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखंन आणि भाषणे
सुरूवात म्हणून ह्या देशासाठी निश्चितपणे चांगले आहे. माझ्या मते ते व्यवहार्य आहे, लवचिक आहे आणि देशाला शांतता आणि युद्धजन्य या दोन्ही परिस्थितीत एकसंध ठेवण्यासाठी पुरेसे समर्थ आहे. मी असे म्हणू शकतो की, खरेच नवीन संविधानाअंतर्गत जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या, तर आपले संविधान वाईट आहे हे त्याचे कारण असणार नाही. आपल्याला असे म्हणावे लागेल की माणूस दुष्ट होता. महोदय, मी संविधान सादर करतो." *
* मूळ इंग्रजी भाषणाचा अनुवाद अतिथी संपादक मंडळाने केला आहे.