२५६ |
ज्यांना काम करण्याची आवड आहे त्यांना संधी द्या
आपापसात भांडणे नकोत
दि. २२ डिसेंबर १९४८ रोजी मुंबईमधील आर. एम. भट हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. माईसाहेब आंबेडकर यांना चहापान देण्याचा कार्यक्रम मुंबई प्रदेश शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या वतीने घेण्यात आला. सदर प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. ते म्हणाले 'सभाधिंपती, बंधुंनो आणि भगिनींनो
मला वाटतं, मला नक्की आठवत नाही, १९४६ मध्ये जे इलेक्शन झाले तेव्हा येथेच आपली एक सभा भरली होती. त्यावेळी मी हजर होतो. आज मी येथे तुमच्यापुढे हजर असल्याने त्यावेळच्या सभेची सहजगत्या आठवण होते. १९४६ च्या इलेक्शनमध्ये आपण आणि आपल्या पक्षाने अपयशाचा बराच मोठा वाटा उचलला होता असे म्हटले पाहिजे. आपण इलेक्शनमध्ये हरलो म्हणून खन्ती वाटण्याचे काही कारण'नाही. पराभवाबद्दल मला विशेष दुःख कधी होत नाही. क्रिकेटच्या सामन्यामध्ये कधी एका संघाचा पराभव होतो. कधी दुसऱ्या संघाचा पराभव होतो. अपयशी ठरणारा संघ पुढे यश मिळवू शकतो. तद्वत यश मिळविणारा संघ अपयशीही ठरण्याचा संभव असतो. इलेक्शनमधील यशापयशाचे असेच आहे. तेव्हा गेल्या इलेक्शनमध्ये काँग्रेसने आपला केवळ पराभवच केला असता तर त्याबद्दल विशेष काही ` मानण्यासारखे नव्हते. . परंतु त्या प्रसंगी काँग्रेसच्या लोकांनी आपल्यावर जो जोर जुलूम व अत्याचार केला; तसा अत्याचार हिंदुस्थानात इतरत्र क्वचितच झाला असेल. नायगावच्या १७ नंबरच्या चाळीतील लोकांवर केवढा प्रसंग ओढवला होता. बाया-माणसांना बाहेर पडणे देखील अत्यंत कठीण होते, मुष्कीलीचे होते. नायगावात मसाला कुटण्याचे एक दुकान आहे. याठिकाणी काम करणाऱ्या एका अस्पृश्य बाईला स्पृश्य गुंडांनी पळवून नेली, तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे वस्त्र फेडून घेऊन तिला नग्नावस्थेत सोडून दिले. असा हा अमानुष अत्याचार होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : मा. फ. गांजरे, खंड ७, पृष्ठ २६-२८. $ £ 9