२२-१२-१९४८ ज्यांना काम करण्याची आवड आहे त्यांना संधी द्या आपापसात भांडणे नकोत - Page 173

ज्यांना काम करण्याची. .. .. . आपापसात भांडणे नकोत १३५

जशी ब्राह्मणेतर पक्षाची गत झाली तशी आपली गत होऊ नये म्हणून हा इषारा देणे अवश्य आहे. होती ती संघटना मोडून ब्राह्मणेतर पक्ष काँग्रेसमध्ये गेला. आता काँग्रेस सोडून बाहेर आले. बाहेर येऊन पुन: स्वतंत्र संघटन करू लागले. दुसऱ्याच्या घरात शिरावयाचे, आतून बाहेर पडावयाचे आणि पुनः मोडलेले घर बांधावयाचे अशा नागमोडी धोरणाचा अवलंब आपण करता कामा नये.

मी असे ऐकतो की, आपल्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका होणार आहेत. ठीक आहे. इलेक्शनचे मला कधीच वावडे नाही. एकाच माणसाने सतत, त्याच जागेवर रहाणं बरं नाही. इलेक्शन करा, पण गुण्यागोविंदाने करा. भेदभाव वाढवू नका. ज्यांना काम करण्याची आवड आहे त्यांना अवश्य संधी द्यावी या मताचा मी आहे. मात्र आपापसात भांडणे नकोत. भांडणे होणार असंतील तर इलेक्शन नको असे मला वाटते.

दुसरी गोष्ट मी अशी ऐकतो की, म्युनिसीपालिटीमधील आपले कॉर्पोरेटर्स काही कामे करीत नाही. मला असंही कुणीतरी सांगितले की आपल्या पक्षाचा नेमलेला ( पार्टी ) म्होरक्या हाही काम करीत नाही. म्होरक्या जर काम करीत नसेल तर त्याचे तुम्ही ऐका असे मी कधीच सांगणार नाही, तुम्ही स्वतंत्र आहात. जो काम करीत नाही असे तुम्हास वाटते त्यास झुगारून देण्याची तुम्हास मुभा आहे. तुम्ही कोणाची तरी गुलामगिरी पत्करावी असे मी कधीच सांगणार नाही.

मी असेही ऐकतो की आपल्या कॉर्पोरेटर्सनी कोणकोणती कामे करावीत हे सांगण्यासाठी एक अँडव्हायझरी बोर्ड नेमण्यात आले आहे. ती कल्पना मला मुळीच पसंत नाही. सल्ला देणारे लोक काही मोठे विद्वान आहेत किवा अनुभवी

आहेत असे म्हणता येणार नाही. उगाच वाद वाढेल.

यावर उपाय म्हणून फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची मिटींग आपल्या कॉपोरेट्सनी

दरेक पंधरवाङ्यात अगर महिन्यास घ्यावी आणि कॉर्पोरेटर्सनी आपल्या कामाचा

रिपोर्ट द्यावा. कॉर्पोरेशनमध्ये काय काम केले, तिच्या मिटींगांना हजर होतो

की नाही, हजर होतो तर झोपलो होतो की ऐकत होतो वगैरे गोष्टींचा रिपोर्ट

कॉर्पोरेटर्सनी फेडरेशनच्या मिटींगमध्ये द्यावा आणि फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी

' हा ठराव मांडावा तो ठराव मांडावा ' असे सांगावे.

आता मी जास्त बोलत नाही. इलेक्शन लवकरच येईल. पुढल्या वर्षात

देशभर इलेक्शन्स होतील त्याची सिद्धता करा. एवढेच सांगून मी आपली रजा

घेतो.