२५७
दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे मोठा मूर्खपणा
आपली झोपडी शाबूत राखा
मनमाड (नाशिक) येथे रविवार, ता. १६ जानेवारी १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. सवितादेवी आंबेडकर यांचे स्वागतार्थ प्रचंड जाहीर सभा झाली. |
जरी सभेची तारीख एकाकी निश्चित करण्यात आली व पुष्कळांना ऊशीरा कळली असली तरी औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक व मुंबई येथून हजारो लोक सभेस हजर राहिले होते. शनिवार दुपारपासून प्रत्येक आगगाडी चिक्कार भरून येत होती. स्टेशनवर व धर्मशाळेच्या आवारामध्ये तर अफाट अस्पृश्य जनसमुदाय जमा झाला होता. त्यामुळे या मेळाव्याला एका मोठ्या यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होतें. प्रत्येक आगगाडी स्टेशनमध्ये येताच
जयभीम ” च्या घोषणेने वातावरण दुमदुमून जात असे. प्रत्येकजण एकमेकांना '“ जयभीम “ ची सलामी देऊन स्वागत करीत होता. डा. बाबासाहेबांचे फोटो छातीवर लावून, प्रत्येक स्त्री-पुरुष विजयी सैनिकाच्या आवेशाने सबंध मनमाडभर संचार करीत होता.
रविवारी बरोबर ११ वाजता पंजाबमेल स्टेशनमध्ये येताच 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ', ' बोलो बोलो जयभीम ', ' शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचा विजय असो ', ' तरूण पार्टी झिंदाबाद, थोडे दिनमे भीमराज ' वगैरे घोषणांनी सर्व मनमाड हादरून गेले होते. डॉ. बाबासाहेबांचे दर्शन मिळावे म्हणून सलूनच्या डब्याच्या दोन्ही बाजूला स्त्री-पुरुषांच्या झुंडी गोळा होऊ लागल्या. इतकी बेफाम गर्दी झाली की, शेवटी बाबासाहेबांना बाहेर येणे अशक्य झाले. शेवटी सर्वांना दर्शन मिळावे म्हणून थोडा वेळ सलूनच्या दोन्ही बाजूच्या खिडक्या उघडून हजारो अस्पृश्य जनतेला त्यांचे दर्शन मिळण्याची व्यवस्था करण्यात आली. नुसत्या दर्शनासाठी भुकेलेले हजारो स्त्री-पुरुष अतृप्त नेत्रांनी जेथून मिळेल तेथून दर्शन घेऊन अक्षरशः आपल्या डोळ्यांची पारणी फेडून घेत होते. अस्पृश्यांचे आपल्या नेत्यावरील हे अलोट प्रेम पाहून स्पृश्यवर्गीय तर थक्कच झाले. . एकाने तर मला