दुसर्याच्या हवेलीत शिरणे . . . .. आपली झोपडी शाबूत राखा १३७
बोलूनही दाखविले की, अखिल हिंदमध्ये आपल्या नेत्यावरील अलोट प्रेम असलेला अस्पृश्य समाज व त्यांचा नेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बरोबरी करणारा दुसरा कोणीच नाही. हिंदचे इतर सर्व पुढारी डॉ. बाबासाहेबांचा या बाबतीत खात्रीने मनातून हेवा करीत असतील.
सभेचा मंडप रंगीबेरंगी पताकांनी सुशोभितं केला होता. "सौ. सवितादेवी ` द्वार". “मातोश्री रमाबाई द्वार" अशी दोन॑ प्रवेशद्वारे उभारण्यात . आली होती ती. मंडपाच्या दर्शनभागी मध्यावर गौतम बुद्धाची प्रतिमा होती. "बुद्धम् शरणं गच्छामि" वगैरे म्हणी असलेल्या पताका लावलेल्या होत्या
सुरवातीला मुंबई प्रांताध्यक्ष श्री. भाऊराव गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ..सवितादेवी आंबेडकर यांचे स्वागत करण्याकरिता व मुंबई इमारत फंडासाठी थैली अर्पण करण्याकरिता सभा बोलविण्यात आली आहे असे सांगितले. नंतर निरनिराळ्या संस्थांतर्फे बाबासाहेबांना, सौ. सवितादेवींना हार अर्पण करण्याचा समारंभ झाला.
सौ. गिताबाई गायकवाड, मुंबई प्रांतिक द. फेडरेशनच्या सेक्रेटरी
कु. शांताबाई दाणी आणि अखिल भारतीय दलित फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी बापूसाहेब राजभोज यांची सुरवातीला भाषणे झाली. नंतर डॉ. बाबासाहेबांनी अर्धा तास सुश्राव्य व आश्वासन देणारे भाषण केले. ते म्हणाले,
माझे मित्र भाऊराव गायकवाड यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रवृत्तीप्रमाणे मला विचारले की, एखादी सभा जर ठरविली तर त्याला माझी काही हरकत आहे का? मी सभेस होकार दिला
मुंबई इमारत फंडासाठी मला चार हजारांची थैली अर्पण करण्यात येईल, असे मला सांगण्यात आले. मला चार हजारांचे आमिष दाखविण्यात आले. (प्रचंड हंशा) त्यामुळेच ही सभा घेण्यात आली. परंतु त्या थैलीचे काय झाले याचा खुलासा आधीच्या वक्त्यांनी आपल्या भाषणात केला नाही. रक्कम जमली व ती चोरीला गेली असेही सांगितले नाही. (प्रचंड हंशा) सभेच्या शेवटी तरी याचा खुलासा होईल, अशी मला दाट आशा आहे.
अलिकडे मी बरेच दिवस राजकारणाबाबत बोलत नाही. कारण मी हल्ली
- राजकीय बंधनात आहे.