१६-१-१९४९ दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे मोठा मूर्खपणा आपली झोपडी शाबूत राखा - Page 179

दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे . . . . . आपली झोपडी शाबूत राखा १४१

झाली नाही. ती म्हणजे निवडणुकीत आपणास स्वतंत्र मतदार संघ मिळाले नाहीत. परंतु यामुळे आपला भाग्योदय थांबणार आहे, असे मी मानणार नाही. जे मिळेल ते पदरात पाडून घ्यावे आणि अधिका करिता मागणी करावी, अशी आपली वृत्ती असावी. अशी एक म्हण तुम्हाला माहीत आहे की "' नेसेन तर जरीची सांडी नाही तर उघडीच बसेन '' या म्हणीप्रमाणे वृत्ती असणे चांगले नाही. त्याच्यात काय पुरुषार्थ आहे ?