परावलंबी वृत्ती टाकून ........ . संघटनेने राहा १४३
१०-११ वर्षापूर्वी ह्याच औरंगाबादेतील मुसलमानांनी दौलताबादेचा किल्ला बघत असताना '' तुम्ही हलक्या जातीचे आहात '' अशी निर्भत्सना केली होती, तिची
आठवण करून दिली. पुनः एकदा हास्य करून डॉक्टरसाहेब म्हणाले, ' तेच
मुसलमान मला माझ्या पायातील जोड्यासह आज थेट त्यांच्या देवांच्याजवळही नेण्यास तयार आहेत.” पाणचक्कोच्या शेजारी जी मशीद आहे तेथे ठेवलेले अडीचशे तीनशे वर्षापूर्वीचे कुणातरी एका साईबाबांचे (फकिराचे) कपडे अगदी जसेच्या तसेच व नीटनेटक्या स्थितीत असलेले पाहून व त्यावरील त्या काळाची वीणकर बघून पूर्वीच्या कलावैभवाचे बाबासाहेबांनी कौतुक केले. नंतर तेथेच थोडीशी विश्रांती घेऊन ते थोडे थंडगार पाणी प्याले. त्यावेळी एका मुसलमान फोटोग्राफरने त्यांचे पुष्कळसे फोटो घेतले. विश्रांतीनंतर बाबासाहेब परत औरंगाबादच्या स्टेट गेस्ट हाऊस येथे दुपारच्या जेवणास परतले.
हैद्राबादेस प्रयाण
त्याच दिवशी संध्याकाळच्या गाडीने ते हैद्राबादेस निघाले. औरंगाबादेस येताना वाटेत जसा सत्कार झाला अगदी तसाच सत्कार औरंगाबाद ते सिकंदराबाद पर्यंतही झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हैद्राबादेस येत आहेत
असे हैद्राबाद दलित फेडरेशनच्या कार्यकर्त्यानी ४-६ दिवस आगाऊ दलित . जनतेस कळविले होते. तेव्हापासून बाबासाहेबांच्या आगमनाची मार्गप्रतिक्षा सर्व
अस्पृश्य जनता ठिकठिकाणच्या स्टेशनवर करीत बसली होती. नांदेड
स्टेशनवर ता. १८ जानेवारी १९४९ च्या पहाटेस गाडी पोहोचली. त्यावेळी
बाबासाहेब झोपलेले होते. त्यांना जागे करून त्रास देऊ नये म्हणून हैद्राबाद
संस्थान दलित फेडरेशनचे चिटणीस श्री. मनोहर यांनी सर्व लोकास विनंती करून,
परत येतेवेळेस बाबासाहेबांच्या दर्शनाचा अलभ्य लाभ आम्ही तुम्हास करवून देऊ
असे आश्वासन दिले. ता. २०-१-४९ रोजी औरंगाबादेस परत येताना गाडी त्याच
नांदेड स्टेशनवर पुनः रात्रीच्यावेळी आली. तेथे अस्पृश्य जनता ता.
१८-१-४९ पासून २१-१-४९ पर्यंत स्टेशन सोडून मुळी घरी गेलीच नाही. सर्व
काळ तेथे तळ ठोकून सर्वजण बसले होते. अक्षरशः उपाशीपोटी, थंडोवाऱ्यात,
अगदी उघड्यावर हे सर्व लोक बाबासाहेबांच्या नुसत्या दर्शनासाठी चार
दिवस थांबले होते.
ता. २१ जानेवारी १९४९ रोजी पहाटेसच गाडी औरंगाबाद स्टेशनच्या
आवारात शिरली. पुन्हा जयघोष व हारतुरे आले. गार्ड ऑफ ऑनर झाला.
हैद्राबादेहून श्री. प्रधान, सिव्हील अँडमिनिरट्रेटिव्ह ऑफिसर हैद्राबाद,
श्री. राजवाडे, सि. अँ. ऑ. औरंगाबाद, श्री. अष्टेकर, डी. एस. पी. यांचेसह ` डॉ. बाबासाहेब औरंगाबाद स्टेट गेस्ट हाऊसमध्ये गेले. तेथे एक पार्टी झाली.