२१-१-१९४९ परावलंबी वृत्ती टाकून एकजुटीने आणि प्रभावी संघटनेने राहा - Page 182

१४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

त्या पार्टीमध्ये स्टेट काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना हारतुरे अर्पण करून, '“ आम्ही अस्पृश्य जनतेच्या सेवेसाठी काय करावे ? * असा प्रश्‍न विचारला. त्यावर बाबासाहेबांनी या सर्व मंडळींना एकच उत्तर दिले : “ तुम्ही सर्वजण आज संध्याकाळी सभेच्या ठिकाणी यावे म्हणजे सर्व आमजनतेसमोर सभामंडपी मी तुम्हाला अस्पृश्योद्धाराचा मार्ग सांगेन व दाखवीन. ''

सांयकाळी ५-३० वाजता त्यांनी मराठा विद्यालयास भेट दिली. याचप्रमाणे ठिकठिकाणच्या संस्थांना भेटी देऊन डॉ. बाबासाहेब सभास्थानी वेळेवर उपरिथत

झाले.

एक लाखाची विराट सभा

सभामंडपाची सजावट शब्दांनी सजविता येणार नाही, इतकी सजविली होती. या सभेस एकूण १८ लाऊडरिपकर्स लावण्यात आले होते. यावरून जनसमुदाय किती प्रचंड होता, याची कल्पना ज्यांनी सभा, परिषदा पाहिल्या असतील त्यांना होईल. लाखाचेवर लोक जमले होते.

प्रथमतः श्री. बी. एस. मोरे, औरंगाबाद स्टेट दलित फेडरेशनचे चिटणीस, यांनी सुरवातीचे प्रास्ताविक भाषण करून हैद्राबाद संस्थानात अस्पृश्य जनतेवर झालेल्या घोर अत्याचाराचे कथन करून नंतर अखिल भारतीय दलित फेडरेशनचे सरचिटणीस श्री. पां. ना. राजभोज यांनी आपल्या नेहमीच्या रोखठोक सवथीप्रमाणे फेडरेशनचे धोरणाविषयी व संघटनेविषयी माहिती सांगितली. नंतर श्री. गायकवाड यांनी ५-१० मिनिटांच्या भाषणात तमाम लोकसमुदायास आपल्या महान नेत्याचे भाषण अत्यंत शांत चित्ताने, कसलाही आवाज न करता ऐकण्याची विनंती केली.

मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मातंग ज्ञातीला फेडरेशनमध्ये सामील व्हा व उत्कर्ष साधून घ्या असा आदेश स्वबांधवांना दिला. "आम्हा सर्व पतित जनतेचे खरे उद्धारक बाबासाहेब आंबेडकर हे एकटेच आहेत.'' असे श्री. मोरे यांनी सांगितले.

नंतर डॉ. बाबासाहेबांचे भाषण झाले. ते म्हणाले,

जोपर्यंत तुम्ही तुमच्या मजबूत संघटनेच्या बळावर आपली ताकद इतर जगाला-समाजाला दाखविणार नाही तोपर्यंत तुमच्यावर हे असले जाच नेहमी चालूच राहाणार. या जुलूमाबाबत तुम्हाला वेदातील एक गोष्ट मला सांगाविशी वाटते. एकदा देवाकडे मेंढराने आपली फिर्याद नेली की “ देवा, तूबा सर्व पृथ्वी निर्माण केलीस, पशु-पक्षी, झाडे-झुडपे, मनुष्यप्राणी इत्यादी अवघे चराचर