२१-१-१९४९ परावलंबी वृत्ती टाकून एकजुटीने आणि प्रभावी संघटनेने राहा - Page 183

परावलंबी वृत्ती टाकून .... . , .. संघटनेने राहा १४५

तू निर्माण केलेस. म्हणून तू आमचा पिता व आम्ही तुझी लेकरे. पर्यायाने आम्ही सर्व भावंडे झालो. तूच निर्माण केलेल्या वाघ-सिहानी डोळ्यादेखत आम्हा मेंढराला अगदी सहज, कसलीही पर्वा व चाड न ठेवता गइटगीळ करावे काय ? देवाने उत्तर दिले : " हे बघ. तू म्हणतोस तशी वस्तुस्थिती आहे खरी. पण त्याचबरोबर हेही खरे आहे की तुझं बाह्य स्वरूपच इतकं नेभळट दिसते की, जरी मी तुझा निर्माता असलो तरीसुध्दा यावेळी तुझी ही दुबळी चर्या पाहून तुला खाऊन टाकावे, असे मला वाटत आहे. तर तुझी ही सदोदित खाली असलेली मान जरा ताठ करून ऐटीत राहा. तरतरीत दिसण्याचा प्रयत्न कर, रूबाबदार राहा, चाल करून आलेल्याचा प्रतिकार करण्याचा न्यायबुध्दी प्रयत्न कर. दुसऱ्यावर विसंबू नकोस, ठोशास ठोसा या न्यायाने वाग. मग पाहू बरे ; कोण तुला त्रास देतो ? कोण तुला खातो ते ? " या कथेप्रमाणे तुम्ही

आपली परावलंबी वृत्ती टाकून एकजुटीने अत्यंत प्रभावी अशा संघटनेने राहा.

„ मी काँग्रेसमध्ये गेलो '' असे म्हणून तुम्हाला थापेबाजी मारून काही

काँग्रेसवाले फसवतील. तरी त्यांच्या थापेबाजीला भुलू नका. मी काँग्रेसमध्ये

गेलो नव्हतो व जात नाही. जर कदाचित प्रसंग आला तर मला मिळालेल्या

या सर्व मानापानाला लाथ मारून मी माझे इच्छित ध्येय पुरे करीन.

माझा स्पृश्य वर्गीयांकडून व मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडून हा जो गौरव केला

जातो, सध्या यांना जी माझी भीती वाटते, या सर्व गोष्टीची मुख्य गोम जर कशात

असेल तर या सर्व लोकांना माझ्या पाठिशी अत्यंत प्रभावी व राजकारण धुरंधर

शक्ती आहे, याची पूर्ण खात्री पटलेली आहे आणि म्हणूनच मी म्हणतो की हा

गौरव, हा मानपान माझा नसून तुम्हा पीडलेल्या, रंजलेल्यांचा आहे ; मी

निमित्तमात्र आहे. तुम्हावर झालेल्या, होत असलेल्या अन्यायाबद्दलची गाऱ्हाणी

मी मांडीन व त्यातून काय काय मिळवावयाचे ते मिळविण्याचा प्रयत्न जरूर

करीन. फक्त तुम्ही आपली संस्था एक राखून संघटित राहा.

७ ७ ७