२१-१-१९४९ केवळ राजकीय प्रगतीने जीवनातील प्रश्न सुटत नाहीत ! - Page 184

२५९
केवळ राजकीय प्रगतीने
जीवनातील प्रश्‍न सुटत नाहीत |

दलितांचे एकमेव पुढारी ने. ना. डॉक्टर भीमराव उर्फ बाबासाहेब आंबेडकर, भारत सरकारचे कायदा मंत्री व काँस्टिट्यूशन मेकींग बॉडीचे अध्यक्ष, यांनी औरंगाबाद येथील मराठा विद्यालयास ता. २१ जानेवारी १९४९ ला सांयकाळी ५-३० वाजता भेट दिली.

मराठा समाज या संस्थेच्या चालकांनी डॉक्टरसाहेबांच्या मानमरातबाला साजेशी सजावट व तयारी केली होती.

सुरवातीस हायस्कुलच्या स्वयंसेवकांनी सलामी दिली. नंतर श्री. माणिकराव मोताळे यांनी स्वागतपर पद्ये गाईली.

तद्नंतर संस्थेचे सभासद, कार्यकारी मंडळ, श्री. खुशालराव मोताळे वकील ह्यांनी डॉक्टरसाहेबांच्या गुणगौरवपर भाषण करून, त्यांना पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर श्री. राजभोज, ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी व श्री. गायकवाड, श्री. सुबय्या इत्यादी दलितांच्या पुढाऱ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

संस्थेचे चिटणीस श्री. पंडितराव गव्हाणे 8. ५. , ८1.8. वकील यांनी त्यानंतर मानपत्र वाचून दाखवले व नंतर टाळ्यांच्या प्रचंड आवाजात ते डॉक्टरसाहेबास अर्पण केले. मानपत्राच्या उत्तरादाखल डॉक्टरसाहेब म्हणाले,

शेतकरी, कामकरी समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीकरिता, मराठा हायस्कूलसारख्या संस्थांची अत्यंत गरज आहे. अशा प्रकारची संस्था औरंगाबादेत निघाल्याबद्दल मला समाधान वाटते.

दलितांचे स्थान हिंदू धर्माचे धर्मग्रंथ व उपनिषदे यामुळे पिढ्यानपिढ्या वरिष्ठ वर्गाची सेवा करणे हेच राहिले आहे.

चातुर्वर्ण्य पद्धतीमुळे दलित वर्गावर घोर अन्याय झाले आहेत. ही परिस्थिती बदललीच पाहिजे. दलित समाजाला मानाचे स्थान कायद्याने मिळणे आवश्यक आहे व ते मिळण्याकरिता दलित वर्गात स्वाभिमान उत्पन्न करणारे शिक्षण त्यांना मिळणे अवश्य आहे.

i

दलित बंधू : १० फेब्रुवारी, १९४९,