प्रश्न सुटत नाहीत ! १४७ केवळ राजकीय प्रगतीने जीवनातील
दलित वर्गाने स्वतः विचार करण्यास शिकले पाहिजे. दलित वर्गाची प्रगती
होणार जागा (९७४ ०७७) मिळाल्याशिवाय त्यांना शासन यंत्रात माऱ्याच्या
वरिष्ठ वर्गाच्या हातात आहेत. नाही. आतापर्यंत त्या जागा
३० जानेवारीनंतर महाराष्ट्रात झालेले अत्याचार हा वरिष्ठ वर्गाने माऱ्याच्या ` जागा आपल्या हाती ठेवून इतर समाजांची पिळवणूक केली ह्याचा परिणाम आहे.
केवळ राजकीय प्रगतीने जीवनातील सर्व प्रश्न सुटत नाहीत. जीवनाच्या प्रगतीकरिता ज्या अनेक गोष्टींची गरज आहे ; त्यापैकी राजकीय स्वातंत्र्य ही
एक होय.
शिक्षण हीच खऱ्या अर्थाने जीवनाच्या प्रगतीकरिता महत्त्वाची बाब होय. गेल्या २५ वर्षापासून मी राजकारणात काम करीत आहे ; पण माझ्या इतक्या दिवसांच्या अनुभवावरून मला असे वाटते की, शिक्षण हीच जीवनातील
सर्वात महत्त्वाची बाब आहे.
गेल्या २-४ वर्षापासून माझे मन दलितजनांच्या शिक्षणाकडे वळले
आहे. म्हणूनच मी मुंबईला सिद्धार्थ कौलेजाची स्थापना केली आहे.
परिस्थिती अनुकूल झाली तर, मराठवाड्यातील दलितजनांच्या प्रगतीकरिता
औरंगाबादेत सिद्धार्थ कीलेजची शाखा काढण्याचा मानस आहे.