२०-११-१९४९ आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे - Page 189

२६१
आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे

अखिल भारतीय दलित फेडरेशनच्या वर्किंग कमिटीची बैठक ता. १९-२० नोव्हेंबर १९४९ रोजी दिल्ली येथे भरण्याचे निश्‍चित झाले आहे. अध्यक्षस्थानी श्री. एन. शिवराज (बी, ए. बी. एल,) राहातील. खास निमंत्रणावरुन या वर्किंग कमिटीच्या बैठकीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर राहाणार आहेत.

वर्किंग कमिटीपुढील कार्यक्रम पत्रिका खालीलप्रमाणे नमूद केली आहे

(१) दलित फेडरेशनच्या देशभर कार्याचा आढावा घेणे.

(२) अ. भा. दलित फेडरेशनचे पुढील धोरण व कार्यक्रम ठरविणे,

(३) अ. भा. दलित फेडरेशनच्या आगामी खुल्या अधिवेशनाचे ठिकाण व तारीख निश्‍चित करणे ;

(४) समता सैनिक वगैरे दलावरील बंदीचा विचार करणे वगैरे.

ज्या कोणास वर्किंग कमिटीकडे सूचना पाठवावयाच्या असतील त्यांनी, श्री. पी. एन. राजभोज, जनरल सेक्रेटरी, अखिल भारतीय दलित फेडरेशन यांच्या नावे, १, हाडिज एव्हिन्यू न्यू दिल्ली या पत्त्यावर पाठवाव्यात असेही त्यानी काढलेल्या या सर्क्युलरमध्ये नमूद केले आहे. जवळ जवळ ३ वर्षांनी वर्किंग कमिटीची बैठक भरत असल्यामुळे तिच्या निर्णयाकडे व आदेशाकडे अखिल अस्पृश्य जनता कुतुहलाने पहात आहे.

ठिकठिकाणच्या प्रांताध्यक्षांसाठी

श्री. राजभोज यांनी दुसरे एक पत्रक, फेडरेशनच्या निरनिराळ्या ्रांताध्यक्षांना उद्देशून काढले असून, त्यांचेकडून अद्यापही फेडरेशनच्या कायाचे अहवाल आलेले नाहीत याबद्दल त्यानी खेद प्रदर्शित केला आहे. निरनिराळया प्रांतांमध्ये किती जिल्हा शाखा आहेत, किती तालुका शाखा आहेत, किती गाव शाखा आहेत त्याचप्रमाणे फेडरेशनचे सभासद किती झाले, पैसे किती जमले व संघटनेचे कार्य कितपत झाले याबद्दलचा रिपोर्ट त्यांनी दरेक प्रांताध्यक्षांकडून

जनता : १२, १९ आणि २६ नोव्हेंबर १९४९.