२६२
राजकीय पक्षांनी स्वत:च्या तत्त्वप्रणालीला देशापेक्षा
मोठे मानले, तर स्वातंत्र्य धोक्यात
आल्याशिवाय राहाणार नाही
दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेन्द्रप्रसाद यांचे समारोपाचे भाषण होऊन त्यादिवशी भारताचे संविधान संमत झाले. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे २५ नोव्हेंबर १९४९ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर , भारतीय संविधानाचे शिल्पकार या शब्दांनी ज्यांचा सार्थ गौरव होतो, यांचे संविधान सभेत शेवटचे भाषण झाले.
संविधान निर्माणासाठी त्यांना किती परिश्रम घ्यावे लागले याची प्रचिती पुढील वृत्तातावरुन येईल,
' चालू महिन्याच्या १७ तारखेस घटना समितीचे कामकाज तहकूब होईल असा अंदाज आहे. घटना सभा स्थगित झाल्यास काही दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण विश्रांती घ्यावी लागेल. विश्रांतिसाठी, सौ. माईसाहेबांच्या समवेत डॉ. बाबासाहेब बहुतकरून काश्मिरला जातील असा रंग दिसतो.
संविधान सभेचे कामकाज चालू असता, डॉक्टरसाहेब रोज १२/१२,१४/१४ तास कामात व्यग्र असतात. येत्या वर्षाअखेर म्हणजे ३१ डिसेंबर १९४९ चे आत त्यांना सर्व घटना पास करून घ्यावयाची आहे. कारण, नवी घटना, २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात यावी असा सर्वांचा संकल्प आहे." *
संविधान निर्मितीतील त्यांच्या योगदानाबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल संविधान सभेच्या बहुतेक सदस्यांनी आणि वृत्तपत्र क्षेत्रातील या संबंधातील जाणकारांनी त्यांची मुक्तकंठाने स्तुति केली, त्यातील काहींचे उद्गार पुढीलप्रमाणे-
'' आर. के. सिधवा - हे सर्वोत्तम संविधान आहे. हे लोकांना सांगणे मी माझं कर्तव्य समजतो आणि संविधान सभेचा प्रत्येक सदस्य हे सांगेल अशी माझी अपेक्षा आहे. आपल्यात कितीही मतभेद असले तरी या संविधानाचा आपल्याला अभिमान आहे. आणि आपण जगाला हे जाहीर करू या जेणेकरून जगाला ही जाणीव होईल की हा दस्तावेज संदर्भ घेण्यायोग्यतेचा आहे. २६ जानेवारी १९५० या ऐतिहासिक दिवशी आपण लोकसत्ताक सार्वभौम राज्य होऊ आणि त्या दिवशी या संविधानाला कायद्याचे स्वरूप प्राप्त होईल याचा मला अभिमान वाटतो. _ TT १) जनता: १७सष्टेबर १९४९
> Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches Vol. 1 3, PP-1164-65.