२५-१-१९४९ राजकीय पक्षांनी स्वत:च्या तत्वप्रणालीला देशाप मोठे मानले, तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही - Page 196

१पट डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

उदय झाला त्यांच्या हितासाठी वेगळ्या कायद्यांना निर्धारित करण्याचाच केवळ त्यांनी प्रयत्न केला असे नव्हे तर त्यांनी नवीन कायदा दिला. भारतात बाल्यावस्थेत असलेल्या लोकशाहीला त्यांनी संविधानाच्या रूपानी कायदा दिला. संविधान निर्माण करणाऱ्या संविधान सभेतील पितामहांची जेव्हा आपण आठवण करतो त्यावेळेस आपण हे विसरता कामा नये की भारतांच्या संविधान सभेत डॉ. आंबेडकर हे सर्वात उत्तुंग व्यक्तिमत्त्व होतं, ज्यांनी वर्तमान संविधानाची प्रत्यक्षात रचना केली. भारतीय लोकशाही व्यवस्थेच्या उत्क्रांतिला सुव्यवस्थित करण्यासाठी तसेच देशाची अखंडता सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे विचार दिशा दिग्दर्शीत करतील." *

सुप्रसिद्ध घटनातज्ञ एस. व्ही. पायली यांनी म्हटले आहे, "' डॉ. आंबेडकरांनी आपल्या सोबत विद्वत्ता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभव पणास लावले, अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्‍नावर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि आपली मते अशावेळी अतिशय प्रभावीपणे तितकेच सुलभपणे ते मांडीत. जगातील सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच १९३५ च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहित होते, घटनेचा मसुदा चर्चिला जात असताना उद्‌भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेह, गोंधळ. असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होत. तकस्पष्ट युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वाना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात, ते साजेसेचं आहे.'' २

बंगालच्या फाळणीमुळे तिथून निवडून आलेल्या काही सदस्यांचे संविधान सभेचे सदस्यत्व संपुष्टात आले होते. त्यात डॉ. आंबेडकरांचाही समावेश होता. तेव्हा पर्यंतच्या त्यांच्या कार्यावरून संविधान सभेला त्यांच्यातील घटनातज्ञाची तसेच त्यांच्या मार्गदर्शनाची व सहकार्याची नितांत गरज भासायला लागली होती हे डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी मुंबई प्रांताचे तत्कालीन प्रधानमंत्री श्री. बी. जी. खेर यांना ३० जून १९४७ रोजी लिहिलेल्या पत्रावरून दिसून येईल. ते आपल्या पत्रात errs emrommorn ono ninemsn emerson noe one nea ov

` फुले-आबेडकर संशोधनातील प्रदुषणे : वसत मून पृ. २१ व २४.

२ तत्रैव . पृ २९.