आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन १६०
ऑक्सफड व म्हणून त्यांना किर्ती लाभली. सुप्रसिद्ध राज्यशास्त्रतज्ञ आणि केंब्रिज विद्यापीठांचे माजी नामवंत प्राध्यापक अर्नेस्ट वाकर ह्यांनी १९५१ साली आपला ' प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पोलिटिकल थिअरी ' हा अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध केला. तो त्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेस (प्रीअम्बल) अर्पण केला आहे. ग्रंथाच्या प्रास्ताविकात ते म्हणतात, '' माझ्या प्रस्तुत ग्रंथाचे विचारसार ह्या उद्देश पत्रिकेत समाविलेले आहे. भारतीय जनतेने आपल्या स्वातंत्र्याचा प्रारंभ करताना ह्या श्रेष्ठ मानवी मूल्यांचा अंगीकार केला ह्याचा मला
अभिमान वाटतो.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर ह्यांच्या कर्तृत्वाचा ह्यापरता मोठा गौरव तो कोणता असणार ! "*
लक्ष वेधणारी अद्वितीय व्यक्ती
' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण जवळ जवळ ५५ मिनिटे चालले होते. त्यावेळी, घटना समितीच्या भव्य हॉलमध्ये गंभीर शांतता पसरली होती. सर्व गॅलऱ्या भरगच्च झाल्या होत्या तरी, कोणाच्या श्वासाची अगर : हातापायाची हालचाल देखील कळून येत नव्हती. उत्कृष्ट वुलन सुट. : पेहरलेल्या, दुरून धिप्पाड दिसणाऱ्या आणि मधून मधून श्रोत्यांकडे दृष्टीक्षेप | करणाऱ्या एकाच व्यक्तिकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित झाले होते. आणिती व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच होत.
डॉक्टरसाहेबांच्या भाषणाच्या सुरवातीस व शेवटी जो टाळ्याचा प्रचंड ' कडकडाट झाला त्याचे वर्णन करणे कठीण आहे. त्यांचेवर टाळ्यांच्या रूपाने गौरवाची वृष्टीच होत होती, भाषणाच्या शेवटी तर ज्यांनी त्यांनी डॉक्टर साहेबांशी हस्तांदोलन करून त्यांना धन्यवाद दिले."
डॉ. बाबासाहेब: आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
' महोदय,
संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर, १९४६ ला झाली. त्याकडे पाहाता आतापर्यंत २ वर्षे ११ महिने आणि १७ दिवसांचा कालखंड लोटलेला आहे. या कालखंडात संविधान सभेची एकूण ११ सत्रे पार पडलीत. या ११ सत्रापैकी ६ सत्रे उदिष्टपू्तीचा ठराव पारित करणे आणि मूलभूत हक्क, केन्द्रीय संविधान,
केन्द्राचे अधिकार, प्रांतिक संविधान, अल्पसंख्यांक या समित्यांच्या अहवालावर
* डॉ. आंबेडकर : घटनाकार : श्री. शांताराम शंकर रेगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ--महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, "मुंबई, पृ. ३५८.
२ जनता : ३ डिसेंबर १९४९.