राजकीय पक्षांनी स्वतःच्या . . . . . . . आल्याशिवाय राहाणार नाही १ ६१
आणि अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमाती यावर विचार-विनिमय करण्यासाठी खर्ची पडली. सात, आठ, नऊ, दहा आणि अकरा ही सत्रे मसुदा संविधानाच्या विचार विनिमयार्थ उपयोगात आणली गेली. संविधान सभेच्या या अकरा सत्राचे प्रत्यक्ष कामकाजाचे १६५ दिवस होतात. त्यापैकी मसुदा संविधानाच्या विचारार्थ सभेने ११४ दिवस उपयोगात आणले.
संविधान सभेने २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीची निवड केली. तिची पहिली बैठक ३० ऑगस्टला झाली. ३० ऑगस्ट पासून १४१ दिवस चाललेल्या कामकाजादरम्यान ती समिती संविधान मसुदा तयार करण्याच्या कामात व्यस्त होती. संविधान सल्लागारांनी मसुदा समितीकडे कामकाजासाठी आराखडा दिला तेव्हा मसुदा संविधानात २४३ अनुच्छेद आणि १३ परिशिष्टे समाविष्ट होती. मसुदा समितीने संविधान सभेला सादर केलेल्या पहिल्या मसुदा संविधानात ३१५ अनुच्छेद आणि ८ परिशिष्टे यांचा समावेश होता. विचार
विनिमयाच्या शेवटच्या टप्प्यात मसुदा संविधानातील अनुच्छेदांची संख्या वाढून ३८६ झाली. तिच्या अंतीम स्वरुपात मसुदा संविधानात ३९५ अनुच्छेद आणि ८ परिशिष्टांचा समावेश आहे. मसुदा संविधानात दुरुस्ती करण्यासाठी अंदाजे ७,६३५ दुरुस्त्या सुचविण्यात आल्या. त्यापैकी २,४७३ दुरुस्त्या सभागृहात प्रत्यक्ष विचारार्थ सादर करण्यात आल्या.
मी या वस्तुस्थितीचा उल्लेख एवढ्यासाठी करतो आहे की एकावेळी असे म्हटल्या जात होते की, आपले काम पूर्ण करण्यासाठी समितीने प्रदीर्घ कालावधी घेतला आहे, ती संथपणे काम करीत आहे आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी करीत आहे. रोम जळत असताना निरो फिडल वाद्य वाजवित बसला होता अशी स्थिती असल्याचे बोलले जात होते. या आक्षेपात काही तथ्य आहे. का ? इतर देशातील संविधान सभांनी त्यांचे संविधान निर्माण करण्यासाठी किती काळ घेतला ते पाहू या. काही उदाहरणे घेऊ या, अमेरिकेच्या सभेची पहिली बैठक २५ मे,
१७८७ ला झाली आणि चार महिन्यात म्हणजे १७ सप्टेंबर १७८७ ला तिने आपले
काम पूर्ण केले. कॅनडाच्या संविधान सभेची पहिली बैठक १० ऑक्टोबर
१८६४ ला झाली आणि मार्च १८६७ मध्ये संविधानाचे कायद्यात रुपांतर झाले,
यासाठी २ वर्षे ५ महिन्यांचा कालावधी लागला. ऑस्ट्रेलियाच्या संविधान
निर्मितीचे कामकाज मार्च १८९१ ला सुरु झाले आणि ९ जुलै १९०० ला संविधानाला
कायद्याचे रुप प्राप्त झाले. त्यासाठी त्यांना ९ वर्षे लागली. दक्षिण
आफ्रिकेच्या संविधान निर्मितीच्या कार्याला आँक्टोबर १९०८ मध्ये सुरुवात झाली