१६२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आणि २० सप्टेंबर १९०९ रोजी संविधानाची परिणती कायद्यात झाली, एक वर्षाच्या परिश्रमात हे घडून आले. हे खरे आहे की, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या सभेने घेतलेल्या कालावधीपेक्षा आम्ही अधिक वेळ घेतला. परंतु कॅनडाच्या संविधान सभेपेक्षा आम्ही अधिक वेळ घेतला नाही आणि ऑस्ट्रेलियाच्या सभेपेक्षा खूपच कमी वेळ घेतला आहे. कोणी किती वेळ घेतला याची तुलना करताना दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांची संविधाने आपल्यापेक्षा फारच लहान आहेत. मी सांगितल्याप्रमाणे, आपल्या संविधानात ३९५ परिच्छेद आहेत तर अमेरिकन संविधानात केवळ ७ आहेत. त्यातील पहिल्या चार अनुच्छेदांची विभागणी २१ उपविभागात झाली आहे. कॅनडाच्या संविधानात १४७, ऑस्ट्रेलियाच्या संविधानात १२८ आणि दक्षिण आफ्रिकेच्या संविधानात १५३ अनुच्छेद आहेत. दुसरी लक्षात ठेवण्यासारखी बाब अशी की, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संविधान निर्मात्यांना संविधान दुरुस्तीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले नाही. सादर करण्यात आलेल्या स्वरुपातच त्या संमत झाल्या. दुसरीकडे आपल्या संविधान सभेल। २,४७३ दुरुस्त्यांचा विचार करावा लागला. ही वस्तुस्थिती लक्षात घेता दिरंगाईचा आरोप मला बराचसा निराधार वाटतो आणि इतके कठीण काम इतक्या अल्पावधीत यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल या सभेने स्वत:चे अभिनंदन केल्यास काही वावगे होणार नाही.
मसुदा समितीने केलेल्या कामाच्या दर्जाकडे पाहाताना श्री. नाझीरुद्दीन अहमद यांना ती पूर्णतया नाकारणे हे आपले कर्तव्य आहे असे वाटते. त्यांच्या मते, मसुदा समितीने केलेले कार्य हे केवळ नाकारण्यायोग्यच आहे असे नव्हे तर ते निश्चितपणे त्याहीपेक्षा खालच्या दर्जाचे आहे. मसुदा समितीने केलेल्या कार्याबद्दल स्वतःचे मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि श्री. नाझीरुद्दीन यांनाही आहे. मसुदा समितीच्या कोणत्याही सभासदापेक्षा आपण अधिक बुद्धिमान आहोत असे श्री. नाझीरुद्दीन अहमद यांना वाटते. मसुदा समिती त्यांच्या या दाव्याला आव्हान करु इच्छित नाही. याउलट संविधान सभेला ते मसुदा समितीवर नियुक्त करण्याच्या योग्यतेचे आहेत असे वाटले असते तर आपल्यात त्यांचे स्वागत करण्यात मसुदा समितीला आनंदच वाटला असता. संविधान निर्मितीच्या योगदानात जर त्यांना काही स्थान मिळाले नाही तर तो निश्चितपणे मसुदा समितीचा दोष नाही.
मसुदा समितीवरील स्वतःचा रोष व्यक्त करण्यासाठी नाझीरुद्दीन अहमद यांनी तिला नवीन नाव दिले आहे. ते मसुदा समितीला भरकटणारी समिती असे म्हणतात. हा टोमणा दिल्याबद्दल नाझीरुद्दीन यांना निश्चितच आनंद होत