२५-१-१९४९ राजकीय पक्षांनी स्वत:च्या तत्वप्रणालीला देशाप मोठे मानले, तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही - Page 203

राजकीय पक्षांनी स्वत:च्या . . .. . . . आल्याशिवाय राहाणार नाही १६५

आणि पं. हृदयनाथ कुंझरु यांचा उल्लेख मी केलाच पाहिजे. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे बहुधा सैद्धांतिक होते. मी त्यांच्या सूचनांचा स्वीकार करु शकलो नाही याचा अर्थ त्यांच्या सुचनांचे मूल्य कमी होते, समितीच्या कामकाजात जिवंतपणा आणण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे महत्त्व कमी होते, असे नाही. मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्याशिवाय संविधानाच्या मूलभूत तत्त्वांच्या स्पष्टोकरणाची संधी मला मिळाली नसती, जी संविधान पारित करण्याच्या तांत्रिक बाबीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.

आणि शेवटी, अध्यक्ष महोदय, या सभेचे कामकाज ज्या पद्धतीने आपण हाताळले त्यासाठी मीं आपले आभार मानायलाच हवे. या सभेच्या कामकाजात, ज्या सदस्यांनी भाग घेतला, त्यांना आपण जी आपुलकीची आणि सन्मानाची वागणूक दिली ती कधीही विसरता येणार नाही. मसुदा समितीने आणलेल्या काही दुरुस्त्या केवळ तांत्रिक स्वरूप असण्याच्या आधारावर काही प्रसंगी नाकारण्याचा प्रयत्न झाला. ते क्षण माझ्यासाठी फारच चिंताजनक होते. संविधान निर्मितीच्या कार्याला पराभूत करण्याच्या उद्देशाने पुढे आणलेल्या कायद्याच्या ताठरपणाला आपण परवानगी दिली नाही, यासाठी विशेषत्वाने मी आपला आभारी आहे. _

संविधानाचे जेवढे समर्थन करता येणे शक्य होते तेवढे माझे मित्र सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि श्री. टी. टी. कृष्णमाचारी यांनी केले आहे. त्यामुळे संविधानाच्या गुणवत्तेविषयीच्या चर्चेत मी शिरु इच्छित नाही. कारण माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहाणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहाणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णतः संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग जसे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका निर्माण करुन देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वतःच्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहाणार आहे. भारतातील लोक आणि त्यांचे राजकीय पक्ष कसे वागतील हे कोण सांगू शकेल ? आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी ते संवैधानिक मार्गाचा अवलंब करतील की क्रांतीकारी मार्गाचा अवलंब करतील ? त्यांनी क्रांतीकारी मार्गांचा अवलंब केल्यास संविधान कितीही चांगले असो, ते अयशस्वी होईल हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेतत्याची गरज नाही. आणि म्हणून भारतीय