११-१-१९५० हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरणे केले पाहिजे - Page 221

हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरण केले पाहिजे १८३

( ' जनते' चे मधले पान उपलब्ध होऊ शकले नाही-संपादक )

करावा व दुसरी अट पहिल्या पत्नीच्या निर्वाहासाठी अगोदर भरपूर रक्कम देण्याची तयारी असल्यास, ही अट सर्वात कठीण आहे.

तेव्हा या अटीचा अर्थ एकच आहे की कौटिल्याला एकपत्निक पद्धती हदी होती.

नव्या हिंदू कायद्यात ज्या घटस्फोटाच्या अटी आहेत त्याला पराशर स्मृतिचा आधार देण्यासारखा आहे. पराशर स्मृतीत स्त्रीला दुसरा विवाह करावयाचा असेल तर नवरा हा नपुंसक असावा लागतो किंवा तो बेपत्ता किंवा तो मृत झाला असेल तरीही द्वितीय विवाह करता येतो. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, पुरुषाला स्त्रीपासून विभक्त होण्याचा अधिकार पहिल्या अटीत मान्य करण्यात आला आहे. आम्ही या हिंदू कोड बिलात घटस्फोट घेण्याच्या अटी आणखी वाढवून त्याची व्याप्ती विस्तृत केली आहे. म्हणजे घटस्फोटाच्या मुद्यावर पराशर स्मृतीसारखा दुसरा अधिकारपूर्ण आधार नाही, असे म्हणावयास हरकत

नाही.

स्त्रियांच्या वारसा हक्कासंबंधी प्रख्यात स्मृतिकार बृहस्पति याचा आधार देता येईल. त्याने असे म्हटले आहे की, विधवेच्या संपत्तीवर कोणालाही वारसा हक्क सांगता येणार नाही. त्याला कारण सांगताना तो म्हणतो की, स्त्री ही पुरुषाची अर्धांगी असल्यामुळे निधनानंतर तो अर्धांगीच्या रूपाने जगतो. म्हणून अर्धांगीच्या धनावर कोणाचाही अधिकार चालू शकणार नाही. मला वाटते हे त्याचे विधान अत्यंत सामर्थ्यवान व पटणारे आहे.

मिताक्षरी वारसा हक्काच्या पद्धतीला मनूचाही विरोध होता हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. तुम्हाला मी हे सांगितले तर आश्‍चर्य वाटेल की मनुसुद्धा एकत्र कुटुंबपध्दतीचा विरोधक होता. कुटुंबाच्या मालमत्तेला त्याचा विरोध होता. पूर्वी यज्ञ हे सर्वश्रेष्ठ कर्म समजले जात असे. यज्ञ जितके जास्त तितका धर्माचा प्रचार जास्त असा आर्यांचा समज होता. स्त्रियांना वेदाभ्यासाचा अधिकार नसल्यामुळे त्यांना यज्ञ करता येत नसे. त्यामुळे त्यांचा संपत्तीवरती अधिकार नसे. पूर्वी यज्ञ व संपत्ती यांचा संबंध निकटचा होता. तेव्हा मनूचा युक्तिवाद पुढीलप्रमाणे आहे. तो म्हणतो :- "' धर्माचा प्रसार जास्त व्हावयाचा