डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे १८४
असेल तर यज्ञ जास्त हवेत. “ हा नियम लागू करावयाचा असेल तर एकत्र कुटुंबपद्धतीमुळे यज्ञांची संख्या कमी होणार नाही काय? तेव्हा या धर्मदृष्टीनेच एकत्र कुटुंबपद्धती ही धर्मविरोधी नाही काय ? आणि मिताक्षरी वारसा पद्धतीचा आधार तर एकत्र कुटुंबपद्धती आहे. मला सनातन्यांना असे विचारावयाचे आहे की तुमचा मनू हा एकत्र कुटुंबाला विरोध करीत होता हे तुम्ही मानाल काय ?
यानंतर दत्तक पद्धतीचा प्रश्न पाहू. हिंदू दत्तक पद्धतीचा उगम कशात आहे हे सुद्धा पाहिले पाहिजे. मनूच्या म्हणण्याप्रमाणे हिंदू माणसाला फेडाव्या लागणाऱ्या चार ऋणांपैकी पितृऋण फेडण्यासाठी एकच पुत्र पुरे. एकापेक्षा जास्त पुत्र असणे हे वैषयिक अभिलाषेचे चिन्ह आहे. म्हणून मनू इतर पुत्रांचा संप्तीवरील हक्कही मान्य करावयास तयार नाही. तेव्हा यावरूनही असे म्हणता येइल की मिताक्षर ही वारसाहक्काची पद्धत मनूच्या नंतरची आहे. मनूने या इतर पुत्रांचा हकक अमान्य केल्यामुळे एक पेचप्रसंग उत्पन्न झाला आणि त्यातूनच दत्तक पद्धती आली. आपस्तंभ-सूत्रात तर पुत्राच्या विक्रयाला किंवा दानाला खंबीर विरोध केला आहे. तेव्हा दत्तकविधान हे तरी शास्त्रसंमत आहे काय, असे मला सनातन्यांना विचारावयाचे आहे. परंतु पुढे समाजाची निकड लक्षात घेऊन वशिष्ठस्मृतीत बदल करण्यात आला. त्याने म्हटले की, हे आपस्तंभ स्मृतीचे बंधन फक्त जेष्ठ पुत्राच्या बाबत आहे. बाकीच्या पुत्रांना दत्तक जाता येईल. तेव्हा अशारीतीने दत्तक पद्धती आली.
तेव्हा या सर्व गोष्टींचा आधारपूर्वक विचार केल्यावर आपण असे ठामपणे म्हणू शकतो की, आजचा रूढ हिंदू कायदा हाच शास्त्रसंमत नाही. हिंदू धर्मशास्त्राशी त्याचा मुळीच संबंध नाही. मूळच्या शास्त्रापेक्षा त्यात खूप बदल झालेला आहे. सनातनी लोक शास्त्रांचा नीट अभ्यास करीत नाहीत, असेच मला म्हणावयाचे आहे. उलट मी तर असे म्हणतो की, आमच्या नव्या सुधारणांनाच कोणत्या ना कोणत्या शास्त्राचे आधार आहेत.
म्हणून माझे असे स्पष्ट मत आहे की, नवे हिंदू कोड बिल हे क्रांतीकारक किंवा जहाल नाही. मी किनाऱ्यालगत बोट हाकणारा मनुष्य आहे. पॅसिफिकमध्ये प्रवास करावयास जाणाऱ्या एकाकी धाडशी प्रवाशाप्रमाणे मी नाही. तसेच जहाल