डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे १८६
एखाद्या सनातनी गृहस्थाला आपल्या मिळकतीतील भाग आपल्या मुलींना द्यावयाचा नसेल तर त्याने आपल्या मृत्यूपत्रात तसा स्पष्ट उल्लेख करावा अगर आपली मुलगी हिंदू नाही, असे म्हणावे. ही हिंदू-स्मृती त्याला पूर्ण स्वातंत्र्य देत आहे. तुम्ही अशा रीतीने नव्या सुधारणांपासून मुक्तही होऊ शकता. तेव्हा
सनातनी वृत्तींचा त्यात नाश आहे, हे थोतांड आहे. हा उत्कृष्ट सुवर्णमध्य आहे. अशा रीतीने सनातन्यांनी आपला मार्ग फार तर आपणच चोखाळावा, पण इतरांकडे त्याच मार्गासाठी आग्रह करू नये.