११-१-१९५० परकीयांच्या गुलामगिरीचा प्रसंग पुन्हा आला तर तो आत्मनाश ठरेल - Page 225

२६४
परकियांच्या गुलामगिरीचा प्रसंग पुन्हा आला
तर तो आत्मनाश ठरेल

लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईस येणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या अगर दुसऱ्या आठवड्यात बहुधा ते येतील. त्यावेळी, घटनेची महान कामगिरी यशस्वीरित्या बजावल्याच्या गौरवार्थ त्यांचे मुंबईस बादशाही थाटाचे स्वागत करण्याचे मुंबई शहर दलित फेडरेशनने निश्चित केले आहे. स्वागताच्या जंगी तयारीसाठी मुंबई शहर दलित फेडरेशनच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाची तातडीची बैठक ता. १ जानेवारी १९५० रोजी बोलाविण्यात आली होती.

प्रसंगानुसार स्वागत

कॉँग्रेस पुढाऱ्यांचे अगर मंत्र्यांचे हरघडी स्वागत होते; तसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाही आणि तसले स्वागत खुद्द डॉ. बाबासाहेबांना आवडत नाही, त्यांचे स्वागत प्रसंगास उचित आणि भव्य असते. स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याचे महान कार्य यशस्वीरित्या त्यांनी पार पाडल्यामुळे कोणा अस्पृश्य बांधवाची छाती अभिमानाने पुढे येणार नाही ? आणि म्हणूनच, मुंबईतील त्यांच्या येत्या आगमनप्रसंगी त्यांचे भव्य स्वागत मुंबई येथे होणार आहे.

स्वागत अभूतपूर्व होणार

२५ जून १९४६ ला त्यांचे असेच जाहीर स्वागत, बाँबे सेंट्रल स्टेशनवर करण्यात आले होते. परंतु त्यापेक्षा येथे स्वागत भव्य होईल, नव्हे अभूतपूर्व ठरेल यात शंका नाही. सुमारे १,५०,००० समुदाय स्वागतासाठी जमेल असा विश्वास मुंबई शाखेच्या दलित फेडरेशनला वाटत आहे.

स्वागताची नक्की तारीख, वेळ व स्थळ स्वतंत्र हँडबिलद्वारे जाहीर करण्यात येईल.

स्वयंसेवक पथक

स्वागताच्या बंदोबस्तासाठी स्वयंसेवक दल उभारण्यात येइल. पांढरा हाफ शर्ट व पांढरी पँट असा गणवेश स्वयंसेवकाचा राहील. त्याचप्रमाणे, त्यांना खास

बॅजेसही देण्यात येतील. दरेक वॉर्डामधून २५-३० स्वयंसेवक घेण्यात येतील.

जनता : ३१ डिसेंबर १९४९ आणि ७ व १४ जानेवारी १९५०.